- प्रतिनिधी
अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस यांच्यातील कथित संबंधांचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करत, काँग्रेस भारतविरोधी शक्तींसोबत उभी असल्याचा दावा केला, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांनी बुधवारी (११ डिसेंबर) केला. ते म्हणाले, काँग्रेस देशविरोधी शक्तींच्या पाठीशी उभे आहे. राज्यसभा अध्यक्षांच्या विरोधात नोटीस देण्यात आली आहे. असा अध्यक्ष मिळणे कठीण आहे.
(हेही वाचा – Mukhyamantri Ladki Bahin Yojana: पुण्यातील १० हजार लाडक्या बहिणींचे अर्ज झाले बाद)
तर राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला असून, त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज गुरुवार, १२ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी बुधवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून काँग्रेसवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, विरोधकांनी सभापतींच्या प्रतिष्ठेवर हल्ला केल्यास आम्ही त्यांना संरक्षण देऊ.
(हेही वाचा – Cabinet Expansion : ‘क्लिन कॅबिनेट’ मुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळाला होत आहे उशीर)
सभागृहाचे कामकाज सुरू होताच किरेन रिजिजू (Kiren Rijiju) म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा उपराष्ट्रपती झाला असून त्याने सभागृहाची प्रतिष्ठा राखल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत सांगितले की, आमचे खासदार सोनिया गांधी आणि सोरोस यांच्यातील संबंधांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. हा देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे… सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणे म्हणजे सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून देशाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा डाव आहे. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. काँग्रेसने कधीही अध्यक्षांचा आदर केला नाही. राज्यसभेचे कामकाज १२ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community