- प्रतिनिधी
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसने गृहमंत्री शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यावर भाजपाने प्रत्युत्तर देत विरोधक खोट्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. राज्यसभेचे कामकाज शुक्रवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तत्पूर्वी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत मागणी केली की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलक भाजपा खासदारांना दिलेल्या वर्तनाबद्दल काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी सभागृहाची आणि संपूर्ण देशाची माफी मागावी. तसेच लोकसभेचे कामकाज शुक्रवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. (Parliament Winter Session)
(हेही वाचा – Amol Kirtikar यांची याचिका न्यायालयाने फेटाळली; वायकरांची खासदारकी कायम)
संसदेच्या आवारात गुरूवारी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि भाजपाचे खासदार एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानंतर धक्काबुक्की झाल्याचा आरोप दोन्ही बाजूने केला जात आहे. मात्र, या झटापटीत भाजपाच्या एका खासदाराची प्रकृती बिघडल्याने त्यांना थेट अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने राजपूत हे सारंगी यांच्या अंगावर पडले. त्यानंतर सारंगी खाली पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर राजपूत यांनाही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजपूत यांच्या प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. (Parliament Winter Session)
(हेही वाचा – सीमेवरील शांततेसाठी Ajit Doval यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेट)
भाजपा खासदार रुग्णालयात दाखल
भाजपाचे खासदार मुकेश राजपूत यांना दिल्लीतील आयएमएल रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. त्याचप्रमाणेच याच रुग्णालयात भाजपाचे दुसरे खासदार प्रताप सारंगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, दोन्ही खासदारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी रुग्णालयात दाखल झाले आहे. तर राहुल गांधी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा खासदारांनी आपल्याला संसदेत जाण्यापासून रोखले. त्यांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. दोन्ही बाजूने धक्काबुक्कीचा आरोप होत असल्याने संसद आवारातील वातावरण चांगलेच तापले आहे. (Parliament Winter Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community