भारतीय जनता पक्षाच्या (BJP) संसदीय पक्षाची बैठक गुरुवारी (०७ डिसेंबर) संसद भवन संकुलात पार पडली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते. तीन राज्यांमध्ये भाजपच्या (BJP) दणदणीत विजयाबद्दल सर्व प्रथम नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी नेत्यांनी ‘मोदीजी स्वागत आहे’च्या घोषणाही दिल्या. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Cyber Safe India ची निर्मिती करणे हे गृह मंत्रालयाचं प्रमुख प्राधान्य)
संसदीय कामकाज
मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, पीएम मोदी (PM Narendra Modi) तामिळनाडू-आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल बोलले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला केवळ चांगले विजय मिळाले नाहीत, तर तेलंगणा आणि मिझोराममध्येही आमची ताकद वाढली आहे, असेही पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले. तीन राज्यांतील विजय हा आमचा सामूहिक विजय आहे, कार्यकर्त्यांचा विजय आहे. (PM Narendra Modi)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी भाजप तरुण चेहऱ्यांना सत्तेची धुरा देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community