Parliamentary Session : लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपाच्या खासदाराची नियुक्ती

202

१८व्या लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असणार यावरून चर्चा सुरु असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशन (Parliamentary Session) सुरु करण्यासाठी भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कटकचे भाजपा खासदार भर्तृहरी महताब हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहेत.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली. महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे रिजीजू म्हणाले. सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम 99 अन्वये सुरेश कोडीकुन्नील, थालिकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा ५० वर्षे राजकारणात केंद्रस्थानी राहूनही शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिले नाही? Chandrakant Patil यांचा सवाल)

हंगामी अध्यक्ष म्हणजे काय?

संसदीय लोकशाहीमध्ये अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभेचे कामकाज चालविणारा नेता असतो. राज्यघटनेच्या कलम ९४ नुसार, “लोकसभा विसर्जित झाल्यानंतर त्याची पहिली बैठक होईपर्यंत अध्यक्ष आपल्या पदावरच राहतात.” नव्या लोकसभेमध्ये सभागृहाच्या अध्यक्षाची निवड साध्या बहुमताने केली जाते. त्याची ही निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षांकडून काही महत्त्वाची कामे पार पाडली जातात. ‘हंगामी’ अथवा ‘Pro-tem’ या शब्दाचा अर्थच ‘थोड्या कालावधीकरीता’ अथवा ‘तात्पुरता’ असा आहे. राज्यघटनेमध्ये या पदाचा उल्लेख केलेला नाही. ‘संसदीय कामकाज मंत्रालया’च्या कार्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेमध्ये हंगामी अध्यक्षाची नियुक्ती आणि शपथविधीबाबतच्या तरतुदी नोंद करण्यात आल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.