Hiranandani On Mahua : महुआ मोईत्रा माझा गैरफायदा घेत होत्या; मात्र माझा नाईलाज होता, दर्शन हिरानंदानींचा दावा

लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपतींकडून पैसे घेणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीवर संकट निर्माण झाले आहे.

124
Hiranandani On Mahua : महुआ मोईत्रा माझा गैरफायदा घेत होत्या; मात्र माझा नाईलाज होता, दर्शन हिरानंदानींचा दावा
Hiranandani On Mahua : महुआ मोईत्रा माझा गैरफायदा घेत होत्या; मात्र माझा नाईलाज होता, दर्शन हिरानंदानींचा दावा

लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपतींकडून पैसे घेणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीवर संकट निर्माण झाले आहे. संसदेच्या एथिक्स समितीने दर्शन हिरानंदानी यांना २६ तारखेला कबुली जबाब देण्यासाठी पाचारण केले आहे. एथिक्स समितीला आरोप खरे वाटले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. यामुळे महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात असल्याची चर्चा रंगली आहे. एथिक्स समितीने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी पाठविलेल्या तक्रारीवर कारवाई सुरू केली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी आणि अधिवक्ता अनंद देहादराय यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे केली होती. एथिक्स समितीने २६ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. (Hiranandani On Mahua)

अशातच, दर्शन हिरानंदानी यांनी पुढे येऊन याबाबत अनेक खुलासे केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये २०१७ मध्ये झालेल्या ‘बंगाल ग्लोबल बिजनेस समिट’पासून आपण महुआ मोईत्रा यांना ओळखत असल्याचे हिरानंदानी यांनी म्हटले आहे. यावेळी मोईत्रा नादियामधील करीमनगरमधून आमदार होत्या. हिरानंदानी यांनी परिषदेच्या वेळचा घटनाक्रम नमूद करीत सांगितले की, बिझनेस परिषदेत येणाऱ्या उद्योगपतींशी चर्चा करण्याची जबाबदारी मोईत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मोईत्रा यांना उद्योग आणि आर्थिक विषयाची उत्तम जाण असल्याचे मोईत्रा यांच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवत होते. जागतिक घडामोडींची अद्यावत माहिती, लोकप्रिय आमदार, उत्तम बुध्दीकौशल्य, स्पष्टवक्त्या आणि तोंडावर बोलणाऱ्या आहेत असे आपल्याला जाणवले होते. याच परिषदेत दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले होते. (Hiranandani On Mahua)

हिरानंदानी यांनी पुढे म्हटले आहे की, ‘देशातील राजकीय घडामोडींची मला असलेली अद्यावत माहिती आणि राजकारणाप्रती माझे असलेले विचार’ या माझ्यातील दोन्ही गोष्टी मोईत्रा यांना आवडल्या आणि कदाचित म्हणूनच पुढे चालून आमची चांगली मैत्री झाली. यानंतर कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत विविध कारणांमुळे भेट व्हायची. परदेशातही भेट व्हायची. कधी फोनवर रोज चर्चा व्हायची तर कधी आठवड्यात भेट व्हायची. मोईत्रा जेव्हा कधी दुबईला जायच्या किंवा मी भारतात आलो तर आम्ही भेटायचो, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Hiranandani On Mahua)

यानंतर महुआ मोइत्रा छोटीमोठी कामे सांगू लागल्या. त्या अशा पध्दतीने कामे सांगायच्या की, हातची सर्व कामे सोडून आधी त्यांची कामे करावी लागायची. एवढेच काय तर, पुढे चालून त्यांनी त्यांच्या कामासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. आपले काम खूप महत्वाचे आहे आणि ते लवकर नाही झाले तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते, असे सांगून त्या हातची कामे सोडून त्यांची कामे करायला भाग पाडत होत्या, असेही दर्शन हिरानंदानी यांनी म्हटले असल्याचे समजते. पुढे चालून महुआ मोईत्रा खासदार झाल्या. त्या राष्ट्रीय राजकारणात ओळखल्या जाऊ लागल्या आणि अनेक प्रभावशाली लोकांच्या संपर्कात आल्यात. आपण त्यांना अनेकदा पार्टी सुध्दा दिली, असेही हिरानंदानी यांनी म्हटले असल्याचे समजते. दरम्यान, पक्षाने आपल्याला राज्यसभेची ऑफर दोन वेळा दिली. मला परंतु जनतेतून निवडून जायचे होते म्हणून मी ती ऑफर स्वीकारली नाही, असे मोईत्रा यांनी आपल्याला सांगितले असल्याचे दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले असल्याची चर्चा आहे. (Hiranandani On Mahua)

महुआ मोईत्रा या खूप महत्वाकांक्षी आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आहे असे त्या सारख्या म्हणायच्या. यामुळे, देश पातळीवर लोकप्रिय व्हायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ले करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे, असा सल्ला एका मित्राने मोईत्रा यांना दिला होता. मोदी एक निष्कलंक व्यक्ती आहेत आणि कुणीही त्यांच्यावर आरोप करू शकत नाही. यामुळे त्यांना टार्गेट केले तर देशभरात लोकप्रिय होणे फार कठीण नाही, असेही त्याने सांगितले होते. मोदींचे सरकारी धोरण, प्रशासन किंवा वैयक्तिक आचरण असे आहे की कुणीही त्यांच्यावर बोट धरू शकत नाही, हे येथे विशेष. (Hiranandani On Mahua)

म्हणूनच, मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांचा आधार घेतला असल्याचे हिरानंदानी यांनी म्हटले आहे. मोदी आणि अदानी मित्र आहेत. शिवाय दोघेही गुजरातचे आहेत. हा मुद्या उचलण्यात मोईत्रा एकट्या आहेत असे नव्हे तर परराष्ट्रातील अनेक छुपे उद्योगपतींचा हात सुध्दा यात आहे. गौतम अदानी यांनी व्यावसायिक जगात अल्पावधीत जे नाव कमाविले त्यामुळे अनेकांचा जळफळाट झाला. यात परराष्ट्रातील मिडीया, व्यवसायीक आणि राजकारणी लोकांचा हात आहे, असेही हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले असल्याचे समजते. (Hiranandani On Mahua)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : जनतेत जा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या; एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांना सूचना)

गौतम अदानी यांच्या धर्मा एलएनजी या कंपनीसोबत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन एक करार करीत असल्याची माहिती मोईत्रा यांना कळाली होती. या माहितीचा उपयोग करून पंतप्रधानांना घेरण्याची योजना त्यांनी आखली आणि त्यात मलाही सामील करवून घेतले. अदानी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे दिसतील? यासाठी काही प्रश्न मोईत्रा यांनी स्वत: तयार केले होते आणि यात आणखी भर घालण्यासाठी काही माहिती देण्याची विचारणा मला ई-मेलच्या माध्यमातून केली होती. मी काही माहिती पुरविली होती. त्यावर एवढ्या प्रतिक्रिया मिळाल्या की मोईत्रा खूप खुश झाल्या होत्या. यानंतर मोईत्रा यांनी मला संसदेचा आयडी आणि पासवर्डही दिला होता. काही प्रश्न मला स्वत:ला अपलोड करता यावे यासाठी त्यांनी आयडी मला दिला होता. मी सुध्दा अनेक प्रश्न अपलोड करीत राहिलो, असेही हिरानंदानी यांनी म्हटले आहे. (Hiranandani On Mahua)

हिरानंदानी यांनी पत्रात म्हटले आहे की, आमची मैत्री सुध्दा अधिक घट्ट होत गेली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात माझाही व्यवसाय वाढत होता. या बदल्यात मोईत्रा यांची काही कामे मला करावी लागत होती. यात दिल्लीतील बंगल्याची डागडुजी, आंतरराष्ट्रीय प्रवासाची व्यवस्था करणे आणि महाग गिफ्ट आदी गोष्टींचा समावेश होता, असे त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, मोईत्रा माझा गैरफायदा घेत आहेत असे मला अनेकदा वाटले. परंतु, माझा नाईलाज होता म्हणून मला त्यांची सगळी कामे करावी लागत होती, असेही हिरानंदानी यांनी म्हटले आहे. आता हा मुद्या संसद आणि न्यायालयासमोर आला आहे. अशात सर्व माहिती देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे असे समजून मी ही माहिती देत आहो, असेही हिरानंदानी यांनी स्पष्ट केले आहे. (Hiranandani On Mahua)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.