I.N.D.I.A आघाडीने देशातील 14 प्रसिद्ध टीव्ही अँकरच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. बुधवारी झालेल्या I.N.D.I.A आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत काही न्यूज अँकर हे विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, अशी चर्चा झाली. आघाडीने हा प्रस्ताव मान्य केला. या प्रस्तावावर गुरुवारी आघाडीने 14 अँकरची यादी जाहीर केली. काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष पवन खेडा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
I.N.D.I.A आघाडीने घेतलेला निर्णय
14 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ’13 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या I.N.D.I.A आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, I.N.D.I.A आघाडीतील सहभागी पक्ष १४ अँकरच्या शोमध्ये जाणार नाहीत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, मीडियाशी संबंधित अँकरची नावे ठरवण्याचा अधिकार दिला समन्वय समितीला दिला होता.
भाजप अध्यक्ष नड्डा यांचा I.N.D.I.A आघाडीवर हल्लाबोल
I.N.D.I.A आघाडीच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’वर हल्ला चढवला आणि त्यांनी आरोप केला की, त्याचे घटक फक्त दोनच गोष्टी करत आहेत, सनातन संस्कृतीवर टीका करणे आणि मीडियाला धमकावणे समाविष्ट आहे. ‘या पक्षांमध्ये आणीबाणीच्या काळातील मानसिकता जिवंत आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
Join Our WhatsApp Community