सध्या राज्यातील अनेक गड-किल्ल्यांवर मुसलमानांनी मजार, मशिदी बांधून अतिक्रमण केले आहे. आधीच पुण्यातील लोहगडावरील इस्लामी अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्याठिकाणी बांधलेली बेकायदा मजार तातडीने हटवण्याची मागणी होत असताना त्याच पुण्यातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या पर्वती टेकडीवरही आता मुसलमानांनी बेकायदा मजार बांधली असल्याचे सामोर आले आहे. विशेष म्हणजे या टेकडीवर पुणेकरांची वर्दळ कायम असते, पण राजरोसपणे होत असलेले इस्लामी अतिक्रमण कुणालाच कसे दिसले नाही, हा प्रश्न आहे.
अशा प्रकारे या टेकडीवर मजार बांधून मुसलमान याठिकाणची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप होऊ लागला आहे. कारण या ठिकाणी मुसलमानांनी नुसतीच मजार बांधली नाही तर आता तिथे नमाज पढण्यासाठीही मुसलमानांची वर्दळ सुरु झाली आहे. काही जागरुक नागरिकांनी हा प्रकार समाजमाध्यमातून उघडकीस आणला.
आम्हाला याबाबत तक्रारी मिळाली आहे. आम्ही त्याची पडताळणी करीत आहोत. ही मजार जुनी असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सर्व संबंधित विभागांच्या नोंदींनुसार वस्तुस्थिती तपासून पाहिली जाईल. लगेच कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे योग्य नाही.
– जयराम पायगुडे, वरिष्ठ निरीक्षक, दत्तवाडी
पर्वती टेकडी चढायला सुरुवात केल्यानंतर दहा ते बारा पायर्या चढून गेल्यानंतर ही मजार लागते. टेकडीवर असलेल्या मोकळ्या ओपन जीमच्या जागेतचा ही मजार बांधण्यात आली आहे. या मजारीभोवती ओट्यासारखे बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर आमदार मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन पोलिसांत तक्रार करण्याची सूचना केली.
(हेही वाचा औरंगजेब धर्मनिरपेक्ष नव्हताच; मंदिरे पाडण्याचे दिलेले आदेश)
दरम्यान, भाजपाचे प्रभारी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी देखील यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. पर्वती परिसरातील एका अनधिकृत थडग्याचा (मजार) विषय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पायगुडे यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिसांनी या विषयांत लक्ष घातले पाहिजे आणि योग्य कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी धीरज घाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याच विषयासंदर्भात मंगळवारी, ६ जून रोजी वन विभागाच्या अधिकार्यांना आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यांनाही या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
काय आहेत पर्वती टेकडीची वैशिष्ट्ये?
पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. पर्वती टेकडी आणि त्यावरील मंदिरे तसेच पेशव्यांचे वस्तुसंग्रहालय ही पुणे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे यांनी पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले. २३ एप्रिल १७४९ रोजी या मंदिराची स्थापना करण्यात आली. पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत. पानिपताच्या तिसर्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे जून १७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले.
(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)
Join Our WhatsApp Community