तब्बल ५ वर्षांपासून बॉलिवूडचा बादशहा अपयशाला सामोरे जात आहे. आता तर त्यांच्या मागे कट्टरतेचे लेबल लागले आहे. त्यामुळे शाहरुख खानने कोणत्या गोष्टींमधून स्वतःतील कट्टरतावादाचे दर्शन घडेल असे कृत्य केले आहे, याकडे हिंदुत्ववादी पाळत ठेवून असतात, याचाच फटका शाहरुखला त्याच्या आगामी पठाण चित्रपटाबाबत बसला आहे. कारण या चित्रपटातून भगव्या रंगाचा अवमान करण्यात आल्याचे सांगत हिंदू धर्मीयांमध्ये कमालीचा असंतोष पसरला होता. याची सेन्सॉर बोर्डाने दखल घेत पठाण चित्रपटात भगव्या रंगाचा अवमान झालेल्या त्या गाण्यासंबंधी काही निर्देश दिले आहेत.
Suggestions For Changes In Shahrukh's Film #Pathan.
Censor Board Asks Makers For Revised Copy. #PrasoonJoshi #CBFC #ShahRukhKhan pic.twitter.com/BnObxxT0U3
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) December 29, 2022
सिनेमात महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश दिले
सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अनेक संघटनांकडून यावर टीका करण्यात आली. ‘पठाण’ या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. पठाण सिनेमाच्या वादात आता सेन्सॉर बोर्डाने सिनेमा आणि त्याच्या गाण्यात काही बदल करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. पठाण सिनेमा नुकताच सर्टिफिकेशनसाठी सेन्सॉर बोर्डाच्या एग्झामिनेशन कमिटीकडे देण्यात आला. CBFCच्या गाइडलाइनुसार, सिनेमा अतिशय बारकाईने पाहण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमातील बारकावे CBFCने लक्षात घेतल्यानंतर आता कमिटीने पठाण सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमात महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश दिले आहेत. सिनेमातील काही दृश्यांसह गाण्यांमध्येही बदल करण्याचे आदेश CBFCनी दिले आहेत. सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या आदेशांमध्ये आता पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यात बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पठाण हा सिनेमा 25 जानेवारी 2023ला प्रदर्शित होणार आहे.
(हेही वाचा संधी असूनही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही; फडणवीसांचा टोला)
Join Our WhatsApp Community