Patra Chawl Land Case: राऊतांविरूद्ध साक्ष देणाऱ्या स्वप्ना पाटकरांना जीवे मारण्याची धमकी

136

पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर जबाब नोंदविलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. पाटकर यांनी ईडीला याबद्दल माहिती देत त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांच्या विरूद्ध दिलेला जबाब बदलावा, यासाठी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासह राऊतांच्या विरोधातील साक्ष मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात आहे, असा आरोप पाटकर यांनी केला आहे.

स्वप्ना पाटकर यांनी काय केली तक्रार

मुंबईतील पत्राचाळ पु्नर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून राऊतांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. ईडीने स्वप्ना पाटकरांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची चौकशीही झाली. संजय राऊतांच्या विरोधात दिलेला जबाब मागे घ्यावा, याकरता बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

(हेही वाचा – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर)

दरम्यान, स्वप्ना पाटकर यांनी ईडी समोर जबाब नोंदवला आहे. परंतु, पाटकर यांनी ईडी आणि मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला दोन-तीन फोन नंबरवरून बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचे म्हटले आहे. राऊतांविरोधातील जबाब मागे घ्यावा, किंवा बदलावा यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राची दखल ईडीने घेतली असून त्यांची ही तक्रार वाकोला पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्त तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनाही याची एक प्रत देखील पाठवण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस यांची चौकशी करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.