निवडणुका समोर पाहून पवार मैदानात उतरत आहेत – Sudhir Mungantiwar

126
निवडणुका समोर पाहून पवार मैदानात उतरत आहेत - Sudhir Mungantiwar
निवडणुका समोर पाहून पवार मैदानात उतरत आहेत - Sudhir Mungantiwar
  • मुंबई प्रतिनिधी
मागच्या तीन दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परवा दिवशी रात्रीपासून हे विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन करत आहेत. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे.विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभा निवडणुका (Vidhansabha nivadnuk) तोंडावर असल्यामुळेच शरद पवार हे आंदोलनात उतरत असल्याचा तोला लगावला आहे.
मविआच्या काळात विद्यार्थ्यांवर अन्याय होत नव्हता का ?
शरद पवार यांच्या भूमिके नंतर आता राज्य सरकारच्या वतीने देखील जोरदार हल्ला चढवीत सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना थेट प्रश्न केला आहे. याआधी महाविकास आघाडीचे सरकार असताना या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता त्यावेळेस आपण मूग गिळून का बसला होतात ? त्यावेळेस आपणास विद्यार्थ्यांच्या अडचणी का दिसल्या नाहीत ? असा प्रति सवाल करीत आंदोलनात उतरण्याची भाषा ही फक्त आणि फक्त विधानसभा निवडणुकांना तोंडासमोर पाहूनच केली जात असल्याचे मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.