अरुणाचल प्रदेशचे (Arunachal Pradesh CM Swearing) विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) हे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. इटानगर येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Pema Khandu)
(हेही वाचा –Sunetra Pawar: ठरलं तर! राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब)
काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत चार जागा जिंकल्या होत्या आणि 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NEDA घटक नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ला पाच जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) ला तीन आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (PPA) ला दोन जागा मिळाल्या. नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (NEDA) चे सहयोगी असलेले मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील NPP अरुणाचल प्रदेशातील पेमा खांडू (Pema Khandu) सरकारला आपला पाठिंबा देईल असे म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीसोबतच १९ एप्रिलला लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. (Pema Khandu)
कोण आहेत पेमा खांडू ?
अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात पेमा खांडू (Pema Khandu) यांचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण तवांगमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीत उच्च शिक्षण घेतले. पेमा खांडू यांची राजकीय कारकीर्द 2011 मध्ये त्यांचे वडील दोरजी खांडू यांच्या हेलिकॉप्टर अपघातात निधनानंतर सुरू झाली. 2011 मध्ये ते अरुणाचल प्रदेश विधानसभेवर मुक्तो मतदारसंघातून निवडून आले होते. या जागेवर त्यांचे वडील निवडणूक लढवत होते. (Pema Khandu)
(हेही वाचा –Malad Crime : आइस्क्रीम कोन मध्ये मानवी बोटाचा तुकडा, मालाड मध्ये खळबळ)
2016 मध्ये, पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काही काँग्रेसचे आमदार पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) या प्रादेशिक पक्षात सामील झाले, अशा प्रकारे पीपीए बॅनरखाली ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर पेमा खांडू आणि त्यांचा गट पुन्हा भारतीय जनता पक्षात सामील झाला आणि भाजपच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून स्थिती आणखी मजबूत केली. (Pema Khandu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community