फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार; CM Eknath Shinde यांचा विश्वास

28
फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार; CM Eknath Shinde यांचा विश्वास
  • प्रतिनिधी

फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. राज्याच्या पंधराव्या विधानसभेसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले. मतदान सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स हॅन्डलवर म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये मतदान हा अधिकार आणि जबाबदारीही. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा आजचा दिवस.

महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी देण्यासाठी आज प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मतदान करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावा, असे आवाहन मी मतदारांना करतो. गेल्या पाच वर्षांतील राज्य कारभार जनतेने पाहिला आहे. २०१९ मध्ये याच मतदारांनी बहुमत कुणाला दिले आणि कुणाचे सरकार आले, हे मतदारराजा विसरलेला नाही.


(हेही वाचा – Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

पहिल्या अडीच वर्षांत झालेले आणि नंतरच्या अडीच वर्षांतील काम लोकांनी पाहिले आहे. विकासाचे मारेकरी कोण आणि विकासाचे वारकरी कोण, हे त्यांना माहित आहे. राज्याची दशा करणारे आणि विकासाला दिशा देणारे नेमके कोण आहेत हे मतदारराजाला माहित आहे.

राज्यातील जनता सूज्ञ आहे. आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणणाऱ्यांना आणि राज्याचा विकास करणाऱ्यांनाच ते निवडतील. राज्याला गतिमान आणि भक्कम सरकार देतील. फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार, असा विश्वास शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.