Uddhav Thackeray : बारसू मधील ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही!

बारसू येथे माती परीक्षण सुरू असतांना लोकांच्या डोक्याला बंदूक लावून परवानगी घेतली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.

209
Uddhav Thackeray : बारसू मधील ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही!

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोकणातील राजापूर तालुक्यातील सोलगाव बारसू परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियमन उद्योग हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित असून या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यास सुरुवात झाली. याला स्थानिक गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. या माती परिक्षणावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद सुरु आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा देत हे आंदोलन अधिक तीव्र केले असा आरोप सरकारकडून केला जात होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रत्नागिरी दौरा करण्याचे ठरवले.

(हेही वाचाबारसू रिफायनरी प्रकल्प: सरकारची पवारांशी चर्चा, उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवार ६ मे रोजी रत्नागिरी दौरा करणार आहेत. या वेळी ते बारसू प्रकल्पातील आंदोलकांना भेटणार आहेत. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार तेथील जिल्हा प्रशासनाने उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली नाही. ठाकरे गटाकडून रानातळे इथे सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र तेथील जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सभेसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही पहा –

रत्नागिरी येथील बारसू येथे माती परीक्षण सुरू असतांना लोकांच्या डोक्याला बंदूक लावून परवानगी घेतली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले “मी बारसू येथे जात असलो तरी मी काही कोणाची हिम्मत बघायला जात नाहीये, मी लोकांना, तिथल्या शेतकऱ्यांना भेटायला जात आहे. रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण आम्हाला मान्य नाही. सरकारने चांगले प्रकल्प गुजरातकडे गेले. हा प्रकल्प चांगला असेल तर लोकांसमोर त्याचे सादरीकरण करा, लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून परवानगी घेताय?” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला प्रश्न केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.