समस्तीपूर जिल्ह्यातील रोसेरा न्यायालयात काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारतीय राज्याविरुद्ध लढण्याच्या’ (India State) विधानाबाबत खटला दाखल करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीने हा खटला दाखल केला आहे, त्याने देशद्रोह असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींना जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) देण्याची मागणी याचिकाकर्ता मुकेश कुमार चौधरी यांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालय या प्रकरणाची सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी करेल. (Rahul Gandhi)
याचिकाकर्ता मुकेश कुमार चौधरी यांनी रोसेरा दिवाणी न्यायालयात (Rosera Court) आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधी यांनी १५ जानेवारी २०२५ रोजी एक प्रक्षोभक भाषण दिले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की त्यांची लढाई केवळ भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाही तर ‘भारतीय राज्या’शी देखील आहे. मुकेश कुमार चौधरी म्हणाले की, हे भाषण ऐकल्यानंतर ते घाबरले आणि त्यांच्या हातातून दुधाची बादली पडली, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. (Rahul Gandhi)
राहुल गांधींच्या विधानाने मुकेश घाबरला …
मुकेश चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले की, राहुल गांधींचे भाषण पाहून ते इतके घाबरले की, त्यांच्या हातातून दुधाची बादली खाली पडली. या घटनेमुळे त्याचे २५० रुपयांचे नुकसान झाले. या भाषणामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे, असे ते म्हणतात. (Rahul Gandhi)
राहुल गांधी यांचे विधान काय ?
१५ जानेवारी २०२५ रोजी काँग्रेस मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, आपण निष्पक्ष लढाईत आहोत असा विचार करणे चुकीचे आहे.जर एखाद्याला असे वाटत असेल की आपण भाजप किंवा आरएसएसविरुद्ध लढत आहोत, तर त्याला परिस्थितीचे गांभीर्य समजत नाही. भाजपा आणि आरएसएसने आपल्या देशातील सर्व संस्थांवर नियंत्रण प्रस्थापित केले आहे. आता आमचा लढा फक्त भाजपा आणि आरएसएस विरुद्ध नाही तर भारतीय राज्याविरुद्ध देखील आहे. (Rahul Gandhi)
राजकीय वर्तुळात खळबळ
मुकेश कुमार चौधरी म्हणाले की, राहुल गांधींच्या या भाषणाने त्यांना एक भारतीय म्हणून खूप धक्का बसला आहे. त्यांनी सांगितले की, राहुल यांचे हे भाषण त्यांच्या घरी टीव्हीवर आणि मोबाईल फोनद्वारे यूट्यूबवर पाहिले. भारतीय राज्याशी संबंधित बातम्या पाहिल्यानंतर मी चिंतेत पडलो. या चिंतेमुळे, हातात असलेली दुधाची बादली खाली पडली आणि त्याचे २५० रुपयांचे नुकसान झाले. (Rahul Gandhi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community