महाविकास आघाडीतर्फे १६ एप्रिल रोजी नागपुरात ‘वज्रमुठ’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला असून, नागपुरातील दर्शन कॉलोनी सद्भावनागनर क्रीडा मैदान बचाव समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्या समितीचे कार्यकर्ते धीरज शर्मा, यांच्यासह इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर व न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.
( हेही वाचा : कोरोना रुग्णसंख्येत वाढ! महाराष्ट्रात तब्बल १११५ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू )
स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र या विरोधाला न जुमानता सभेचे मुख्य संयोजक सुनील केदार तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासह नेत्यांनी मैदानाची पाहणी करीत सभा होणारच हे स्पष्ट केले. काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी गरज भासल्यास आमदार निधीतून मैदान चांगले करून देऊ असे सांगितले. पण दुसरीकडे आमदार कृष्णा खोपडे माघार घेण्यास तयार नाही. त्यांनी ज्या भागात सभा होणार आहे त्याभागातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन सुरू केले आहे.
Join Our WhatsApp Community