अखेर पेट्रोल-डिझेलचे दर घसरले! किती झाले?

गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली.

पेट्रोल-डिझेलच्या दराचा चढता आलेख पाहून सर्वसामान्यांची अक्षरशः गोची झाली आहे,  अशा वेळी दिवाळीत मोदी सरकारने सामान्यांना सुखद धक्का दिला. पेट्रोल ५ रुपयाने तर डिझेल १० रुपयाने स्वस्त केले. याकरता तेल कंपन्यांनी नव्हे तर मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे.

मोदी सरकार बनलेले लक्ष्य 

मोदी सरकारने उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्याने इंधन दरात घसरण झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर जनतेला हा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर १०० रुपयांच्या पुढे ११० रुपयांपर्यंत वाढले आहेत, तर डिझेल १०० रुपयांपर्यंत पोहचल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशांतर्गत किमतींमध्ये वाढ होत गेली. विरोधकांनी वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विरोधकांनी देशभरात आंदोलन पुकारले होते. ठिकठिकाणी इंधन दरवाढीवर आंदोलन करण्यात आले. अखेरीस मोदी सरकारने दरवाढीवर तोडगा काढत उत्पादन शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपयाने स्वस्त होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here