पेट्रोल डिझेलच्या दरांवरुन सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. याचसंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या आतंरराष्ट्रीय किमतीत झपाट्याने वाढ झाली असतानाही भारतात पेट्रोलचे दर केवळ दोन टक्क्यांनी वाढले आहेत.
गुरुवारी संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी व्हॅट कमी केला होता. तर काही भाजपविरोधी राज्यांनी केला नाही. पुढे बोलताना पुरी म्हणाले की, मी सांगू इच्छितो की, अद्याप पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि झारखंडने त्यांच्या दरात कपात केलेली नाही.
( हेही वाचा: ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश )
केंद्र सरकारने दोन वेळा कमी केला व्हॅट
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, पेट्रोल पंपावरील किंमत वाजवी पातळीवर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली आहे. पुरी पुढे म्हणाले की, मला तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की, काही राज्यांनीही व्हॅट कमी केला आहे. आता आमची अशी परिस्थिती आहे की, काही राज्ये 17 रुपये दराने व्हॅट आकारत आहेत आणि इतर भाजप विरोधी राज्य 32 रुपये दराने व्हॅट आकारत आहेत.