‘भोंग्यांना हात लावाल ना तर…’ आता या संघटनेचा मनसेला इशारा

157

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उठवण्याचे राज्य सरकारला आवाहन केले आहे. त्यामुळे यावरुन अनेक आरोप-प्रत्योरोप होत असताना, आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेने मनसेला इशारा दिला आहे. मुंब्र्यातील या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेला इशारा दिला आहे. भोंग्यांना हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशा शब्दांत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेला इशारा दिला आहे.

3 मेपर्यंत राज्याच्या मशिदींवरील भोंगे हटले नाहीत, तर अशा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावायचं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील सभेत केले. त्यानंतर राज्यात धार्मिक तेढ वाढवण्याचा मनसेकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून करण्यात येत होता. मनसेच्या या भूमिकेच्या विरोधात आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(PFI)ही मुस्लिम संघटना आक्रमक झाली आहे.

(हेही वाचाः ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)

छेडेंगे तो छोडेंगे नही

मुंब्रा येथील या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मनसेला इशारा दिला आहे. छेडेंगे तो छोडेंगे नही, असे म्हणत एकाही मशिदीवरील भोंग्याला हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशा शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. या आंदोलनानंर त्यांनी मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण कडलक यांना एक निवेदन देखील दिले आहे.

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका

या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पीएफआय ही संघटना देशातील मोठी संघटना नाही, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला महत्व देऊन राज्यातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न करू नका, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचाः राष्ट्रवादीची हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी, मुसलमान प्रसाद खाऊन सोडणार रोजा)

काय आहे पीएफआय संघटना?

17 फेब्रुवारी 2007 रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. देशातल्या मुस्लिम संघटनांपैकी ही एक महत्वाची संघटना मानली जाते. देशातील एकूण 23 राज्यांमध्ये ही संघटना सक्रीय आहे. या संघटनेवर देशातल्या अनेक दंगलींचा आरोप दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.