लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा (Phase 4 Lok Sabha Election 2024) आज (१३ मे) महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. आज महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान पार पडतं आहे. पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे या आणि अशा सगळ्याच दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पुण्यासह महाराष्ट्रात ज्या भागांमध्ये निवडणूक पार पडते आहे, तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Phase 4 Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा –Mumbai Police यांची मोठी कारवाई; तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त)
देशभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदार मतदान केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. पहिल्या तीन टप्प्यांत राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले असून आपल्या अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असेल. (Phase 4 Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा –S Jaishankar : भारत-चीन संबंधांसाठी सीमेवर शांतता हवी; एस जयशंकर यांचे महत्त्वाचे विधान)
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. साठवण तलावाच्या प्रश्नावरून बहिष्कार टाकण्यात आला आहे. गावात 2130 मतदार आहेत. साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावा, तरच मतदान करणार, असा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे. (Phase 4 Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community