Phase 4 Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड!

109
Phase 4 Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड!
Phase 4 Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड!

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा (Phase 4 Lok Sabha Election 2024) आज (१३ मे) महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. आज महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान पार पडतं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) २५ ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे २५ ठिकाणी इव्हीएम मशीन बदलण्यात आल्या आहेत. (Phase 4 Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Delhi : दोन रुग्णालयांनंतर आता IGI विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी, तपास सुरू)

पुण्यासह महाराष्ट्रात ज्या भागांमध्ये निवडणूक (Phase 4 Lok Sabha Election 2024) पार पडते आहे, तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Phase 4 Lok Sabha Election 2024) देशभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदार मतदान केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. पहिल्या तीन टप्प्यांत राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले असून आपल्या अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असेल. (Phase 4 Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Phase 4 Lok Sabha Election 2024: चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू! महाराष्ट्रातील ११ मतदासंघात मतदान)

अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanka) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, असं म्हणत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी मतदान केलं आहे. आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरी माझ्या घरातले कोणीही मतदान बुडवत नाही, मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे. याची जाणीव आम्हाला आहे. असं सुबोध भावे म्हणाले आहेत. (Phase 4 Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.