Phase 4 Lok Sabha Election 2024: मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार, महायुतीच्या उमेदवाराचा दावा

151
Phase 4 Lok Sabha Election 2024: मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार, महायुतीच्या उमेदवाराचा दावा
Phase 4 Lok Sabha Election 2024: मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार, महायुतीच्या उमेदवाराचा दावा

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा (Phase 4 Lok Sabha Election 2024) आज (१३ मे) महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. आज महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान पार पडतं आहे. जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. (Phase 4 Lok Sabha Election 2024)

मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता

मतदान (Phase 4 Lok Sabha Election 2024) केल्यानंतर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे आणि देशभरामध्ये आमच्या ४०० पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये काही भागात उष्णतेमुळे मतदान जरी कमी झाले असले मात्र आज उष्णता कमी असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावावा.” अशी प्रतिक्रिया यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मला दानवे, आमदार संतोष पाटील दानवे, सून रेणू दानवे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. (Phase 4 Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Devendra Fadanvis : मुंबईतून मराठी माणूस हद्दपार!, फडणवीस यांनी कुणावर साधला निशाणा)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. संगमनेरमधील जोर्वे गावामध्ये त्यांनी मतदान केले आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कांचन थोरात व कन्या जयश्री थोरात यांनी देखील मतदान केलं आहे. संगमनेरमध्ये आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती मिळावी म्हणून सूचना दर्शक फलक देखील लावण्यात आले आहेत. (Phase 4 Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.