फोन टॅपिंग प्रकरणी सध्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला चर्चेत आल्या आहेत. हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. त्यावेळी रश्मी शुक्ला स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोनवरील संभाषण ऐकायच्या असा जबाब एका अंमलदाराने नोंदवला आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
६० दिवस राऊतांचा फोन टॅप होत होता
२०१९ मध्ये संजय राऊतांचा फोन टॅप करण्यात आला होता. जवळपास ६० दिवस राऊतांचा फोन टॅप केला गेला. राऊत फोनवर कुणाचा उल्लेख साहेब म्हणून करतात, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शुक्ला यांनी दिल्याचा जबाब पोलीस अंमलदाराने नोंदवला आहे. हा अंमलदार त्यावेळी गुप्तवार्ता विभागात कार्यरत होता. या प्रकरणी पोलिसांनी ७०० पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. त्यात १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. संजय राऊतांचा फोन टॅप करताना त्यांचा उल्लेख एस. रहाटे असा करण्यात आला होता. मात्र अंमलदाराने राऊतांचा आवाज ओळखला. रहाटे (राऊत) कोणासोबत बोलतात, कोणत्या घडामोडी, बैठकांचा उल्लेख करतात, मातोश्री आणि सह्याद्री अतिथीगृहाबद्दल काय म्हणतात, याची नोंद ठेवण्याचे आदेश शुक्लांनी दिले होते, असे अंमलदाराने जबाबात म्हटले.
(हेही वाचा राऊतांचा इतिहास ‘कच्चा’… म्हणाले, औरंगजेब गुजरातचा ‘बच्चा’)
Join Our WhatsApp Community