फोन टॅपिंग सत्ताधाऱ्यांचे शस्त्र! संजय राऊतांच्या आरोप 

सत्ताधारी ब्लॅकमेलसाठी फोन टॅपिंगचा वापर करत असतात, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.  

फोन टॅपिंग हा प्रकार सर्रास होत राहतो. हे फोन टॅपिंग म्हणजे राजकीय प्रकरण बनले आहे. सरकार कुणाचेही असो, विरोधकांचे फोन टॅपिंग केले जातात. ते सत्ताधाऱ्यांचे शस्त्र बनले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

ब्लॅकमेलसाठी हत्यार! 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजपचे खासदार असताना २०१७ साली त्यांचा फोन टॅप झाल्याचे उघडकीस आले, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संगितले कि, फोन टॅपिंगचे प्रकरण राजकीय प्रकरण आहे, जे विरोधात असतात त्यांचे फोन टॅपिंग होतच राहतात. मला अनेकजण सांगतात फोनवर बोलताना सांभाळून बोला, पण आमच्याकडे लपवण्यासारखे काय आहे? फोन टॅपिंग हे ब्लॅकमेलसाठी शस्त्र बनले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा : रेमडेसिवीरचा तुटवडा मग राजकारण्यांकडे साठा कसा?   )

काय म्हणाले नाना पटोले!

काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजपचे खासदार असताना त्यांचा फोन टॅप झाल्याची माहिती आता समोर येत आहे. नाना पटोले २०१७ साली भाजपचे खासदार असताना त्यांचा फोन टॅप झाल्याचे समोर आले. अमजद खान नावाने हा फोन टॅप झाला असून, त्यांच्यासोबत त्यांच्या चारही सहकाऱ्यांचे देखील फोन टॅप झाल्याचे सांगितले जात आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले कि, मी भाजपचा खासदार होतो, त्यावेळी राज्यात कोणाचे सरकार होते हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येकाला त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य असते. कोणीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. सरकारच्या मान्यतेशिवाय कोणाचे फोन टॅप करता येऊ शकत नाहीत. त्याबाबत सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली.

एक प्रतिक्रिया

  1. अहो तुम्ही तेव्हाही सत्तेत होतात भागीदार म्हणून. मग काय माती खात बसला होतात तेव्हा. आधी शेण उचलायचे, मग हात बरबटले म्हणून बोंब मारायची. खरंच तुमचा आता कंटाळा येतोय. बाळासाहेबांची लाज घालवणे एवढेच काम आहे का तुम्हाला? कुठूनतरी रोज काहीतरी करून त्यांची image लोकांच्या मनातून कमी करणे, ह्याची सुपारी घेतली आहे असे वाटते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here