राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून बंड करून अजित पवार यांनी फारकत घेऊन सरकारमध्ये सामील झाले असले तरी त्यांच्या मंत्रालयाच्या केबिनमध्ये शरद पवार यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. अजित पवार यांच्यासाठी मंत्रालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या दालनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो वापरायचा नाही असा आदेश दिला होता. तर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले होते. पक्षाच्या मालकीचा वाद सुरू असून अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर; राज्य सरकारचा निर्णय)
शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये नाराजी ?
शिवसेनेच्या मंत्र्याकडे असलेले ३ आणि भाजपकडे असलेले ६ खाते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत. तर शिवसेनेचे संजय राठोड, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांचे मंत्रीपद जाणार अशी चर्चा होती.परंतु काही खाते काढून घेतल्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांची नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community