अभिनेत्रीकडे केली शरीरसुखाची मागणी, छायाचित्रकाराला अटक

एका बंगाली अभिनेत्रीला वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तिचे न्यूड फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका बॉलिवूड छायाचित्रकाराला मालाड पोलिसांनी टिटवाळा येथून अटक केली आहे.

तिचे न्यूड फोटो शूट केले

ओमप्रकाश राजू तिवारी असे या छायाचित्रकाराचे नाव आहे. ओमप्रकाश याची एका बंगाली अभिनेत्री सोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने स्वतःला एका बड्या प्रोडक्शन हाऊससाठी फोटोग्राफी करीत असल्याचे या अभिनेत्रीला सांगितले होते व तुला नेटफिल्क्सच्या एका वेब सिरीजमध्ये काम मिळवून देतो, असे सांगून तिला फोटो सेशनसाठी बोलावून तिचे न्यूड फोटो शूट केले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे त्याने शरीर सुखाची मागणी केली.

(हेही वाचा मुले चोरून परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद! ४ महिन्यांच्या बालिकेची सुटका)

टिटवाळा येथून अटक करण्यात आली

या मागणीमुळे घाबरलेल्या अभिनेत्रीने मालाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेऊन त्याला टिटवाळा येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी देखील आरोपीने अनेक महिला आणि तरुणींना नोकरीचे अमिश दाखवून त्याच्यावर लैगिंग अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here