केरळमधील मुसलमानांच्या कार्यक्रमात झळकले Hamas आणि हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचे फोटो

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धादरम्यान, ऑक्टोबर २०२३ मध्ये मलप्पुरम येथे झालेल्या रॅलीत हमासचा (Hamas) नेता खालेद मशाल याने किमान ७ मिनिटे भाषण दिले होते.

358

केरळमधील पलक्कड भागातील एका मशिदीच्या मिरवणुकीत हमास (Hamas) आणि हिजबुल्लाह नेत्यांचे फोटो ठळकपणे दाखवण्यात आले. त्यावर याह्या सिनवार, इस्माईल हनीयाह आणि हसन नसरल्लाह या दहशतवादी कमांडरांचे फोटो होते. या तिन्ही दहशतवाद्यांना इस्रायलने ठार केले आहे.  १६ फेब्रुवारीला संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात कम्युनिस्ट आणि काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणांनी हत्तींवर हे बॅनर लावले होते.

केरळमध्ये कट्टरतावादाला उघडपणे प्रोत्साहन

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पलक्कड येथील मुसलमानांचा धर्मगुरू त्रिथला यांच्या दर्ग्यावर उरुसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सजवलेल्या हत्तींवर स्वार झालेल्या काही तरुणांनी तीन हमास (Hamas) नेत्यांचे पोस्टर लावले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर, भाजप आणि इतर हिंदू संघटनांनी आरोप केला आहे की, केरळमध्ये कट्टरतावादाला उघडपणे प्रोत्साहन दिले जात आहे.

(हेही वाचा Taxi करता इकोसोबत सीएनजीच्या इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांनाही परवानगी देण्याची मागणी )

३,००० जमाव जमला 

या कार्यक्रमाच्या आयोजकांनी अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी या कार्यक्रमात काँग्रेस नेते व्हीटी बलराम आणि मंत्री एमबी राजेश यांच्या उपस्थितीमुळे बरीच टीका झाली आहे. या उरूसच्या कार्यक्रमात सुमारे 3 हजार लोक सहभागी झाले होते. सध्या राज्यात पॅलेस्टिनचे समर्थन करण्याचे जणू फॅड निर्माण झाले आहे. या कार्यक्रमातील हे कृत्य त्याचाच एक भाग होता.

हमासचा नेता खालेद मशालने केलेले भाषण

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धादरम्यान, ऑक्टोबर २०२३ मध्ये मलप्पुरम येथे झालेल्या रॅलीत हमासचा (Hamas) नेता खालेद मशाल याने किमान ७ मिनिटे भाषण दिले होते. २०२३ च्या अखेरीस केरळमध्ये इस्रायलविरुद्ध आयोजित कार्यक्रमात हमासच्या एका नेत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाषण दिले होते.  ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी संघटनेच्या युवा शाखा ‘सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंट’ ने आयोजित केले होते. त्यानंतर वाद झाला तरी पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केला नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.