आधार कार्डवर मिळणार 5 लाखांचं कर्ज, सरकारने स्पष्ट सांगितलं

129

सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. आधार कार्ड धारकांना केंद्र सरकारकडून 4.78 लाख रुपयांचे कर्ज मिळणार असल्याचा दावा या मेसेजमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधार कार्ड धारक कर्ज घेण्यासाठी पात्र असतील असे या मेसेजमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मेसेजवरुन लोकांना सावध केले आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना सरकारने सुरू केली नसल्याचे पीआयबी फॅक्ट चेक विंगने स्पष्ट केले आहे.

सरकारकडून स्पष्टीकरण

केंद्र सरकारकडून आधार कार्डवर कोणतेही कर्ज देण्यात येत नसून हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे पीआयबीच्या फॅक्ट चेक विंगने ट्वीट करत स्पष्ट केले आहे. त्यामुळे असले मेसेज कोणीही इतरांना शेअर करू नयेत, असे आवाहनही या ट्वीटद्वारे करण्यात आले आहेत. तसेच फसवणूक टाळण्यासाठी अशा प्रकारच्या कुठल्याही लिंकवर सुद्धा क्लिक करू नये, असे देखील सरकारने सांगितले आहे.

(हेही वाचाः जम्मू-काश्मीरमध्ये 25 लाख नवे मतदार, काय आहे कारण?)

काय आहे व्हायरल मेसेज?

केंद्र सरकारकडून आधार कार्ड धारकांना 4 लाख 78 हजारांचे कर्ज देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी Apply Now या बटनावर क्लिक करा, असे या व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.