समांतर सरकारचा दावा करणारी संघटना ‘एसी सरकार’ने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) आपल्या समुहाचा स्तंभ उभारला आहे. एसी सरकार (AC Sarkar) समूह भारत सरकारला मानत नाही. ते ब्रिटनच्या राणीला आपली राणी मानतात. नाशिक-गुजरातच्या सीमा भागात डांग परिसरात हा समूह सक्रिय आहे. त्यांनी स्तंभ उभारल्यानंतर आता राज्य सरकार आणि पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
‘एसी सरकार’ ही संघटना समांतर सरकारचा दावा करते. या समुहाने हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये स्तंभ उभारून ब्रह्मगिरी पर्वतावर आपला दावा केला आहे. स्थानिक पुरोहितांनी पवित्र ब्रह्मगिरी (Brahmagiri) पर्वतावर कोणतेही बांधकाम करू नये, यासाठी आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. पुरोहितांनी स्तंभांचे काम काही काळासाठी रोखलेही होते. आता मोठा स्तंभ उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. 100 ते 150 लोकांनी येऊन हा स्तंभ उभारल्याची माहिती आहे.
एसी सरकार संघटना काय आहे ?
‘एसी सरकार’ सरकार हा आदिवसींचा समुदाय आहे. ते भारताचे खरे शासनकर्ते आहेत, असा त्यांचा दावा आहे. ‘एसी सरकार’ सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारला फक्त संस्था मानते. दक्षिण गुजरात आणि नंदुरबारमध्ये समुदायाचे प्राबल्य वाढत आहे. या समुदायातील लोक मुख्यतः निसर्गाचे पूजक आहेत. ‘एसी सरकार’ ही 12 लोकांची मुख्य समिती आहे. मुख्य समितीला कंसिलेशन कमिटी, असे म्हटले जाते.
एसी सरकारच्या विरोधात नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांना (Lok Sabha Elections 2024) विरोध केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यातच आता हा स्तंभ उभारण्यात आला आहे. सरकारविरोधात पाऊल उचलणाऱ्या या एसी सरकारला वेळीत रोखण्याचे आव्हान आता राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर आहे. एसी सरकार संघटनेचे नक्षलवाद्यांशी काही संबंध आहेत का, याचाही तपास करण्याची मागणी केली जात आहे.
… तर लोकांच्या संघटनातून स्तंभ जमीनदोस्त करू – महंत अनिकेतशास्त्री महाराज
मी ब्रह्मगिरी पर्वतावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. वारंवार लोकप्रतिनिधींना याविषयी सांगूनही काहीही झाले नाही. माझे आदिवासी बांधवांना आवाहन आहे की, तुम्ही मूळ हिंदू आहात. आमचे आहात. स्तंभ उभारणारे ख्रिस्ती मिशनरी, मुसलमान असतील, तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. प्रशासनाने २ दिवसांत हा स्तंभ हटवला नाही, तर लोकांच्या संघटनातून तो जमीनदोस्त करण्यात येईल, असा इशारा महर्षि पंचायतन सिद्धपीठमचे महंत अनिकेतशास्त्री महाराज (Aniket Shastri Maharaj) यांनी दिला आहे. (AC Sarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community