महायुतीचे लोकसभेचे उमेदवार पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात पियूष गोयल बोलत होते. भाजपासह युती तोडून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांचा (Devendra Fadnavis) विश्वासघात केला. एवढंच नाही उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या सगळ्या सिद्धातांना तिलांजली दिली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. आता ते बिनबुडाचे विषय घेऊन ते शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात गेले. असं पियूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले आहेत.
शरद पवारांनी अजित पवारांचा विश्वासघात केला
उद्धव ठाकरे चुकीचं वागल्यानेच शिवसेनेत बंड झाले असं सांगतानाचं पियूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले, “लोकांना आणि शिवसेनेतल्या लोकांना कळलं की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय करत आहेत तेव्हा त्यांनी बंड पुकारलं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंसह मोजके लोकच राहिले. अजित पवार आमच्याबरोबर आले तेव्हा तर हे समजलं आहेच की २०१७ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये राष्ट्रवादीला आमच्यासह यायचं होतं. अजित पवार सरकारमध्ये येणार हे शरद पवारांना माहीत होतं. मात्र शरद पवारांनी अजित पवारांचा विश्वासघात केला.” असंही पियूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
बिनबुडाचे मुद्दे उद्धव ठाकरे बाहेर काढत आहेत
“उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचाही विश्वासघातच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विश्वासघात केला. बाळासाहेब ठाकरेच म्हणाले होते की, काँग्रेससह जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेन. पण उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी अभद्र आघाडी केली. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरे मंचावर असताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कितीतरी वेळा सांगितलं की, पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांची महत्वकांक्षा किंवा वचन हे काहीही बोलून दाखवलं नाही. मोदींच्या नावाने मतं मागितबिनबुडाचे मुद्दे उद्धव ठाकरे बाहेर काढत आहेतली होती. आता . त्यांचा पक्ष फुटला त्याचं कारण तेच आहेत.” असं पियूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community