Piyush Goyal यांनी ‘ते’ वचन पाळले; गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून…

163
Piyush Goyal यांनी 'ते' वचन पाळले; गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून...
Piyush Goyal यांनी 'ते' वचन पाळले; गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून...

जून महिन्यात पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी कोकणासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून ट्रेन सोडण्याबाबतची मुंबईकरांची मागणी समजून घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून येत्या गणपतीत रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. गोयल यांनी दिलेला शब्द पाळत गणेशोत्सवाला आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असताना या रेल्वे सेवेचे उद्घाटन करत मुंबईतील कोकणवासीयांना दिलासा दिला.

पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरून धावणारी ही पहिली मुंबई-गोवा ट्रेन (Mumbai-Goa Train) आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि गोव्यासह कोकण विभाग यांच्यातील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आजपासून सुरु झालेल्या वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या द्वि- साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. (Piyush Goyal)

कोकणासाठी नवीन रेल्वे सेवा
पश्चिम रेल्वेने यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली. “आनंदाचा क्षण…! कोकणासाठी नवीन रेल्वे सेवा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी वांद्रे टर्मिनस ते मडगांव दरम्यानच्या नवीन ट्रेनच्या उद्घाटन सेवेला बोरिवली येथे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवला.” या ट्विटसह पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली. (Piyush Goyal)

‘इथे’ असणार थांबे
२० डब्बे (LHB – Linke Hofmann Busch कोचेस) असलेली ही रेल्वे गोव्यातील मडगांव येथून दर मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटून वांद्रे टर्मिनसला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तर वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटलेली रेल्वे रात्री १० वाजता मडगांवला पोहोचेल. आज या रेल्वेसेवेतील पहिली गाडी बोरिवलीहून दुपारी सुटली. ही रेल्वेगाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळे या स्थानकांवर थांबेल. (Piyush Goyal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.