दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ८ तारखेला निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यातच १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) देखील सादर होणार आहे. यावर निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिल्ली निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत सूचना केली आहे. देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मांडणार आहेत. त्यामध्ये दिल्लीसाठी केलेली तरतूद अथवा योजनांची घोषणा अर्थमंत्र्यांना करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने तसे पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे. दिल्लीत निवडणूक असल्याने दिल्ली केंद्रीत कोणतीही घोषणा, तरतूद केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात (Union Budget) नसावी असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यावेळीही दिल्लीची निवडणूक एकाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. जवळपास १.५५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरू नका. निवडणूक प्रचारात भाषेची काळजी घ्या, असा सल्ला निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना, नेत्यांना दिला आहे.
Join Our WhatsApp Community