कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो: न्यायालय म्हणते ‘त्यांना जनाधार आहे!’

99

देशातील कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याप्रकरणी आक्षेप घेणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच याचिकाककर्त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्यावर संबंधितांना कोवीन ऍपकडून प्रमाणपत्र दिले जाते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोला आक्षेप घेणारी याचिका पीटर म्यॅलीपरम्पली यांनी केरळ उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने निर्णय दिला. त्यामध्ये न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिक्रिष्णन यांनी ही ही याचिका फेटाळून लावली. लसीकरण ही राष्ट्रीय योजना आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का असावा?, अशी विचारणा याचिकाकर्त्याने केली आहे.

(हेही वाचा आता शत्रुघ्न सिन्हांचे कुटूंब अडचणीत! कारण काय?)

न्यायालय म्हटले, मोदींना जनसमर्थन मिळाले

त्यावर न्यायालय म्हटले की, नरेंद्र मोदी यांना जनाधार प्राप्त आहे, म्हणून ते पंतप्रधान आहेत. जरी त्यांची राजकीय विचारसरणी वेगळी वाटत असली, तरी ते आजही देशाचे पंतप्रधान आहेत. यावर तुम्हाला आक्षेप असण्याचे कारण काय? तुम्ही जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूटमध्ये काम करता, मग तुम्ही विद्यापीठाला हे नाव काढण्यास सांगणार का?, असे म्हटले. सध्या कारागृहात असलेल्या हजारो आरोपींचे खटले, दावे प्रलंबित आहेत, जे सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो कौटुंबिक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांची सुनावणी तात्काळ होण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.