- प्रतिनिधी
मुलाचे निसर्ग आणि प्राणीप्रेमी दाखवून घराजवळ म्हणजे धारावीमध्ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड उद्धव ठाकरे यांना बळकावयाचा असल्याने धारावीकरांची माथी भडकावली जात आहेत, असा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवारी (१७ ऑक्टोबर) केला. शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांचा निर्बुद्ध असा उल्लेख करत ते शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाल्याची टीकाही शेलार यांनी केली.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : घाटकोपर पश्चिमसाठी शिवसेनेकडे चांगला उमेदवार असल्यास भाजपा करणार जागेची अदलाबदली)
आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी उद्योग समूह आणि भाजपावर चौफेर हल्ला चढविला आहे. या टीकेला आणि आरोपांना शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. आदित्य ठाकरे हे निर्बुद्धासारखे अभ्यास न कराता बोलत आहेत. धारावीमध्ये ७० टक्के दलित, मुस्लिम आणि मराठी माणसे आहेत. त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत. मुंबई महापालिकेला १५ हजार कोटी रुपये, मुंबईकरांना ४३० एकरमधील ३७ टक्के जागेत खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यारखी मोकळी जागा मिळणार आहे. एक वाहतूक हब ही याच परिसरात उभा राहणार आहे. मग धारावीकर, मुंबईकर, मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांचा फायदा होणार असताना आदित्य ठाकरे यांचा विरोध का? असा सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावेळी केला.
(हेही वाचा – काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षातून Hiraman Khoskarkhoskar यांची हकालपट्टी )
लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करून धारावीकरांना हे सरकार तुमच्या विरोधी आहे असे वातावरण निर्माण करून नेरेटीव्ह सेट करण्याचा उद्धव ठाकरे गट आणि आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न आहे. हा एक आंतराष्ट्रीय कट असून शहरी नक्षलवाद्यांचे आदित्य ठाकरे हे प्रवक्ते झाले आहेत, अशी टीका शेलार (Ashish Shelar) यांनी केली. आज हे बोलतोय म्हणून आम्ही कंत्राटदार प्रेमी आहेत असेही ते आरोप आमच्यावर करतील. पण त्याची तमा न बाळगता आम्ही आज मुंबईच्या, मुंबईकरांच्या हिताचे आहे म्हणून सत्य मांडण्यासाठी बोलणार आहोत. जे मुद्दे आम्ही मांडतो आहोत त्याची उत्तरे आदित्य ठाकरे, खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पक्षांनी द्यावी. आम्ही कधीही खुल्या चर्चेला तयार आहोत, असे आव्हानही शेलार (Ashish Shelar) यांनी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community