टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे PM Narendra Modi आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते उद्धाटन

66
टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे PM Narendra Modi आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते उद्धाटन
टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे PM Narendra Modi आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते उद्धाटन

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) गुजरातमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यात वडोदरा येथील टाटा एअरक्राफ्ट कॉम्पलेक्सच्या उद्धाटनाचाही समावेश होता. या एअरक्राफ्ट कॉम्पलेक्समध्ये सी २९५ प्रोग्रामच्या अंतर्गत ४० रणनीतिक वाहतूक विमानांची निर्मीती भारतात होणार आहे.

(हेही वाचा : बोरिवलीत भाजपामध्ये उमेदवारीवरून तणाव; Gopal Shetty बंडखोरी करणार)

सी २९५ प्रोग्रामच्या अंतर्गत स्पेनकडून १६ विमानं भारताला मिळणार आहेत. तर उरलेल्या ४० विमानांची निर्मिती भारत करणार आहे. भारतीय सैन्यासाठी खासगी क्षेत्रामार्फत केलेली ही पहिलीच भारतीय निर्मिती आहे. यामध्ये निर्मिती ते चाचणी, डिलीव्हरी आणि विमानाच्या संपूर्ण मेंटेनंसची जबाबदारी टाटा एअरक्राफ्ट कॉम्पलेक्स घेणार आहे. या उद्धाटनाच्या वेळीस पंतप्रधान मोदी म्हणाले ” टाटा एअरक्राफ्ट कॉम्पलेक्सच्या माध्यमातून भारत आणि स्पेन यांच्या मैत्री अधिक दृढ होणार आहे. मेक इन इंडीया आणि मेक फॉर वलर्डच्या दिशेने घेतलेली ही यशस्वी झेप आहे.” (PM Narendra Modi)

पुढे मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. आज ते आपल्यात असते तर त्यांना हे पाहून फार आनंद झाला असता. या प्रकल्पाची मूळ कल्पना एका दशकाहून अधिक काळापूर्वी, २०१२ मध्ये टाटा सन्सचे तत्कालीन अध्यक्ष, रतन टाटाजी यांनी मांडली होती, असा उल्लेख ही पंतप्रधानांनी केला.

दरम्यान स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ म्हणाले ” आज या उपक्रमामुळे, युरोपच्या इतर कंपन्यांसाठी भारताचे समृद्ध दालन खुले होईल. या प्रकल्पामुळे दोन वेगळ्या देशांतील समृद्ध गोष्टींचा संगम होईल. टाटा म्हणजे औद्योगिक साम्यर्थचे प्रतीक आहे. त्यामुळे टाटा म्हणजे जणू एखादे शिखररत्न आहेत. ज्यांच्यामुळे टाटा कंपनीचे प्रोडक्टस जगाच्या बाजारपेठेत लोकांसाठी उपल्बध असतात.(PM Narendra Modi)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.