देशातील विरोधीपक्ष दिशाहीन झाले असून अशी अवस्था यापूर्वी पाहिली नसल्याची टीका (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी त्यांनी विरोधी आघाडीच्या ‘इंडिया’ नावावरही टीकास्त्र सोडले. पंतप्रधान आज, (मंगळवार २५ जुलै) भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करतांना बोलत होते. या बैठकीतील घडामोडींसंदर्भात ज्येष्ठ भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली.
सभागृहात विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, रणनीती आखण्यासाठी भाजपने संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. या सभेत (PM Narendra Modi) पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
(हेही वाचा – Population : लोकसंख्येत चीन नंबर वन; 1 जुलैला भारताची लोकसंख्या 139 कोटी)
यावेळी पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, विरोधी पक्ष हताश आणि निराश आहे आणि त्यांच्या वागण्यावरून असे दिसून येते की त्यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांसारख्या नावांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, केवळ देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही. विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे ‘इंडिया’ हे नाव लोकांची दिशाभूल करण्यासाठी ठेवले आहे. ईस्ट इंडिया कंपनीतही ‘इंडिया’ हे नाव आहे. त्यांचा विरोध दिशाहीन आहे. त्यांना दीर्घकाळ विरोधी पक्षातच राहायचे आहे, असा निर्धार विरोधकांनी केल्याचे दिसते.
Glimpses from today’s @BJP4India Parliamentary Party meeting in Delhi. pic.twitter.com/dt6LDceUin
— Narendra Modi (@narendramodi) July 25, 2023
वर्तमान जगामध्ये भारताची प्रतिमा खूप सुधारली आहे आणि आम्ही या दिशेने काम करण्यासाठी समर्पित आहोत. अमृत काळ संपेपर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू, असे पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले. देशवासीयांना आमच्याकडून खूप आशा आहेत आणि विरोधकांना त्याची माहित आहे की ते सत्तेत येणार नाहीत. आगामी काळात विरोधक मोडीत निघतील.जनतेच्या पाठिंब्याने भाजप २०२४ च्या निवडणुकीतही सत्तेवर येईल. तसेच पुढील काळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community