नाशिक जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) घोटाळा उघडकीस आला आहे. सरकारी पोर्टलवर येथील भादवण गावात राहणारे १८१ मुसलमान यांची लाभार्थी म्हणून नोंद करण्यात आली आहे. हे मुसलमान मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे हे मुसलमान ज्या भादवण गावाचे असल्याची नोंद करण्यात आली. त्या गावाच्या ५०० वर्षांच्या इतिहासात तिथे एकही मुसलमान कुटुंब राहत नाही. त्यामुळे योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) फायदा उठवणारे १८१ मुसलमान या गावात कुठून आले?, ते भादवणचे रहिवासी नसताना त्यांना येथील कागदपत्रे कुठून मिळाली? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. याविषयाचे वृत्त आता प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
काय आहे प्रकरण?
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत साकीर आलम नावाच्या बँक खात्यात २००० रुपयांचा हफ्ता जमा झाला. याचा मागोवा घेतला असता याच खात्याचे पश्चिम बंगालमधील नाव साकिबुल रेहमान असे आढळले.
(हेही वाचा Sambhal Masjid सरकारी जमिनीवर; उत्तर प्रदेश सरकारची सर्वोच्च न्यायालयाल माहिती)
स्थानिकांना नाकारले अनुदान
याच गावातील ४६ स्थानिक लाभार्थ्यांना केवायसी अद्ययावत न केल्याने योजनेचा लाभ नाकारण्यात आला होता. तसेच दिले गेलेले पहिल्या टप्प्यातील अनुदानही परत घेण्यात आले होते. या मुसलमान बोगस लाभार्थ्यांची सरकारी पोर्टलमधील नोंदीमध्ये अजूनही केवायसी अद्ययावत नाही. तरीही त्यांना या योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) हप्ता मिळत आहे. त्यामुळे एकीकडे विविध कारणे सांगून स्थानिकांना या योजनेचा लाभ नाकारण्यात येत असताना पश्चिम बंगालचे असलेले मुसलमान त्यांना नाशिक येथील गावाचे म्हणून बोगस कागदपत्रांवर या योजनेची खिरापत वाटली जात असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारचा या योजनेतील घोटाळा हा एका गावातील आहे. देशपातळीवर याची व्याप्ती किती असेल, याची या आकडेवारीवरून कल्पना येते. भादवण प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घातले आहे.
काय आहे योजना?
राज्यात ही योजना (PM Kisan Samman Nidhi) १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत याद्वारे केली जाते.
Join Our WhatsApp Community