पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सलग ११ व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (78th independence day) केलं आहे. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात जमलेल्या जनतेवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं.
“छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की, आपण मिशन मोडवर इज ऑफ लिंव्हिंगसाठी काम केलं पाहिजे. मी युवक, प्राध्यापकांना आवाहन करतो की तुम्हाला येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींवर असलेल्या उपयांबद्दल सांगा. कोणतेही कारण नसताना उभ्या राहिलेल्या या अडचणींविषयी सरकारला पत्राद्वारे सांगा. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे. तुम्ही सरकारला सांगा की अमूक-अमूक गोष्टीची विनाकारण अडचण होती. ती दूर केली तर काहीही फरक पडणार नाही, हे पत्राद्वारे सांगा.” (78th independence day)
“आपण बदलाबाबत बोलत आहोत. आज देशात साधारण 3 लाख वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत. पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य, जिल्हा, केंद्र पातळीवर वेगवेगळ्या 3 लाख संस्था आहेत. मी या सर्व संस्थांना आवाहन करतो की, वर्षात आपल्या स्तरावर फक्त दोन बदल करा. कोणताही विभाग असो फक्त एका वर्षात दोन बदल करा. जनतेचं आयुष्य सुकर करणारे हे बदल हवेत. हे बदल प्रत्यक्ष राबवावेत. हे बदल प्रत्यक्षात आल्यास एका वर्षात 25 चे 30 लाख बदल घडून येतील. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील तेव्हा सामान माणसाचा विश्वास वाढेल. त्याची शक्ती राष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत होईल. त्यामुळेच या संस्थांनी बदल घडवण्यासाठी हिंमत करून पुढे यावे. सामान्य नागरिक जर पंचायत पातळीवर अडचणींचा सामना करत असेल तर त्या अडचणी दूर करायला हव्यात.” (78th independence day)
“महिला स्वावलंबी होतायत, ही सामाजिक बदलाची गॅरंटी”
“गेल्य दहा वर्षात दहा कोटी महिला वुमन सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. याचा आम्हाला गर्व आहे. सामान्य कुटुंबातील दहा कोटी महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होत आहेत. जेव्हा महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होतात तेव्हा कुंटुंबात ती महिला निर्णय प्रक्रियेचा भाग होते. ही एक मोठ्या सामाजिक बदलाची गॅरंटी आहे. भारतातील सीईओ जगभरात नावाजले जात आहे. दुसरीकडे एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आतापर्यंत 9 लाख कोटी रुपये महिला स्वयंसहायता बचत गटाला मिळाले आहेत. या मदतीमुळे महिला अनेक काम करत आहेत.” अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. (78th independence day
हेही पहा –
Join Our WhatsApp Community