78th independence day : “…तर २०४७ पर्यंत भारताचे विकसित राष्ट्रचे लक्ष्य पूर्ण होऊ शकते”, पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

131
78th independence day :
78th independence day : "...तर २०४७ पर्यंत भारताचे विकसित राष्ट्रचे लक्ष्य पूर्ण होऊ शकते", पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सलग ११ व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (78th independence day) केलं आहे. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात जमलेल्या जनतेवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत.

विकसित राष्ट्राच्या मुद्द्यावरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज आपण 140 कोटी आहोत. जर 40 कोटी भारतीय गुलामीची बेडी तोडू शकतात. 40 कोटी लोक स्वातंत्र्याच स्वप्न पूर्ण करु शकतात, तर 140 कोटी लोक संकल्प घेऊन निघाले, एक दिशा ठरवून निघाले, तर आव्हान कितीही असोत, प्रत्येक आव्हानाला पार करुन समृद्ध भारत बनवू शकतो 2047 साली विकसित भारताचा स्वप्न साकार करु शकतो. 2047 पर्यंत विकसित भारताच स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सुचवल्या आहेत. माझ्या देशवासियांनी हे सुचवलं आहे, म्हणून मी ते वाचलं. देशवासियांची इतकी मोठी स्वप्न आहेत. देशवासियांचा हा विश्वास अनुभवातून आला आहे.” असं ते यावेळी म्हणाले. (78th independence day)

“स्वातंत्र्य मिळालं पण… ”
“बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला. सतत सरकारकडे मागावं लागायचं. आम्ही गर्व्हन्सच हे मॉडल बदललं. आज सरकार स्वत: लोकांपर्यंत जातय.” (78th independence day)

“स्पेस सेक्टर एक भविष्य”
“स्पेस सेक्टर एक भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टर मजबूत करत आहोत. आज प्रायवेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या. त्याबरोबर दोन गोष्टी अजून झाल्या. त्यामुळे विकासाला गती मिळाली. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच निर्माण आणि सामन्य माणसासाठी इज ऑफ लिव्हिंगवर भर दिलाय.” (78th independence day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.