PM Modi : सभेला आलेल्या जनतेची मागितली माफी; काय आहे कारण

मोदींचं उत्तराखंड येथे प्रचारानिमित्त भाषण, जेव्हाही उत्तरखंडच्या पवित्र भूमीत येतो, तेव्हा मला खूप भाग्यशाली वाटते.

242
PM Narendra Modi यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार
PM Narendra Modi यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार

लोकसभा २०२४ (Lok Sabha 2024)च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सुरुवात केली आहे. ते मंगळवारी उत्तराखंड (Uttarakhand) येथील रुद्रपूर (rudrapur) येथे पोहोचले. या वेळी पंतप्रधान मोदींनी जाहीर भाषणाच्या सुरुवातीला सभेला जमलेल्या नागरिकांची माफी मागितली. “आम्ही लोकांनी जो विचार केला होता, त्यापेक्षा मंडप खूप लहान पडला. जितके लोक मंडपात आहेत. त्यापेक्षा जास्त लोकं हे बाहेर आहेत. आमच्या व्यवस्थेतील त्रुटींबद्दल मी माफी मागतो.” (PM Modi)

(हेही वाचा – Naxal Attack: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, आठ नक्षलवादी ठार)

उत्तरखंडच्या भूमीला माझ्या सलाम 

रुद्रपूर येथील भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी तुम्हाला खात्री देतो की, तुम्ही आता उन्हात उभे आहात, तुमची ही तपश्चर्या व्यर्थ जाऊ देणार नाही.” मी उत्तराखंडमधील जनतेचा विकास करून, उत्तरखंडच्या जनतेच्या विजेचं बिल शून्य झालं पाहिजे. यासाठी पंतप्रधान सौरऊर्जा (Solar Power) कार्यक्रमांतर्गत काम केलं जाईल,असे आश्वासन दिले. तसेच देवभूमीचे (Devbhumi) ध्यान केल्याने मी नेहमी धन्य होतो. मी जेव्हाही उत्तरखंडच्या पवित्र भूमीत येतो, तेव्हा मला खूप भाग्यशाली वाटते. हे माझं भाग्य आहे. मी अशा भूमीला सलाम करतो, असे विधान पंतप्रधान मोदींनी केले. (PM Modi)

(हेही वाचा – MLA Vijay Shivtare: अजित पवारांसाठी शिवतारे मैदानात; ज्यांच्याविरुद्ध पुकारले बंड, त्यांच्याच प्रचाराचा केला शुभारंभ)

मोदींचा जन्म मेहनत करणाऱ्या जनतेसाठी 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनतेला २४ तास वीज मिळेल, वीज बील शून्य होईल आणि विजेपासून पैसेही मिळतील. यासाठी ‘पीएम सूर्य (PM Surya) घर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. त्यामुळे लोकांचा स्वाभिमान वाढला आहे. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याची गॅरेंटी दिली आहे. तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद म्हणजे लोकांचे उत्पन्न वाढेल. नोकरीच्या संधी वाढतील. खेड्यापाड्यात आणि शहरात सोयी वाढतील. मोदींचा जन्म हा तुमच्या सारख्या मेहनत करणाऱ्यांसाठी झाला आहे, असे देखील पंतप्रधान मोदींनी भाषणात म्हटले. (PM Modi)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.