सुधारित वक्फ कायद्यामुळे (Waqf Amendment Act Bill) गरिबांची होणारी लूट थांबेल. देशातील आदिवसींची जमिन किंवा मालमत्तेला वक्फ बोर्ड हात लावू शकणार नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. हरियाणाच्या हिसारहून अयोध्येसाठीच्या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. याप्रसंगी मोदींनी हिसारच्या महाराजा अग्रसेन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणीदेखील केली.सुधारित वक्फ कायदा (Waqf Amendment Act Bill) दि. ८ एप्रिल रोजी देशभरात लागू झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान म्हणाले की, वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. जर वक्फ मालमत्तेचा लाभ गरजूंना दिला असता तर त्यांना त्याचा फायदा झाला असता. पण या मालमत्तेचा भूमाफियांनी फायदा घेतला. या सुधारित वक्फ कायद्यामुळे गरिबांची होणारी लूट थांबेल. वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होईल.
( हेही वाचा : Vinesh Phogat : हरयाणा सरकारकडून रोख रकमेचं बक्षीस घेतल्याबद्दल विनेश ट्रोल, सोशल मीडियावर दिलं उत्तर)
मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमांदा परिवार, महिला, विशेषतः मुस्लिम (Muslim) विधवा आणि मुलांना त्यांचे हक्कदेखील मिळतील. त्यांच्या हक्कांचेही रक्षण होईल. हा खरा सामाजिक न्याय असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने (Congress) केवळ काही कट्टरपंथियांना खूश केले. उर्वरित समाज मागास, अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या या वाईट धोरणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वक्फ कायदा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) जे स्वप्न पाहिले होते, त्यांनी संविधानात सामाजिक न्यायाच्या तरतुदीवर जी तरतूद केली होती, त्यावर काँग्रेसने वार करुन संविधानातील तरतुदींना तुष्टीकरणाचे साधन बनवले, अशी जोरदार प्रतिक्रिया मोदींनी (Narendra Modi ) दिली.
काँग्रेसने (Congress) आमच्या पवित्र संविधानाला सत्ता मिळविण्यासाठी शस्त्र बनवले. जेव्हा जेव्हा काँग्रेसवर (Congress) सत्तेचे संकट ओढवले तेव्हा त्यांनी संविधान मोडले. काँग्रेसने बाबासाहेब यांच्याबाबतीत काय केले? हे आपण विसरू नये. जोपर्यंत बाबासाहेब हयात होते तोपर्यंत काँग्रेसने त्यांचा अपमान केला. त्यांना दोनदा निवडणुकीत हरवले. काँग्रेसने त्यांच्या स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्नही केला. काँग्रेसला बाबासाहेबांचे विचार कायमचे संपवायाचे होते. डॉ. आंबेडकर हे संविधानाचे रक्षक होते, पण काँग्रेस संविधानाचा भक्षक बनली, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचे मुस्लिम प्रेम बेगडी असून त्यांनी आजवर कधीही मुस्लिम व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष बनवले नसल्याची टीका देखी पंतप्रधानांनी केली. (Muslim)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community