PM Modi श्रीनगरमध्ये! १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची केली पायाभरणी

166
PM Modi श्रीनगरमध्ये! १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची केली पायाभरणी
PM Modi श्रीनगरमध्ये! १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची केली पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) गुरुवारी (20 जून) संध्याकाळी दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) दौऱ्यावर पोहोचले. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC), श्रीनगर येथे ‘एम्पॉवरिंग यूथ, ट्रान्सफॉर्मिंग जम्मू आणि काश्मीर’ या कार्यक्रमात सहभागी झाले. येथे त्यांनी युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले. 1500 कोटी रुपयांच्या 84 प्रकल्पांची पायाभरणीही केली. यावेळी ते म्हणाले की, जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली. जनतेचा आमच्या धोरणांवर विश्वास आहे. जनतेच्या अपेक्षा केवळ आपले सरकारच पूर्ण करू शकते. आमच्या सरकारला विलंब आवडत नाही. (PM Modi)

योग दिनाची थीम ‘योगा फॉर सेल्फ एंड सोसायटी’

पंतप्रधान मोदी 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजल्यापासून योग दिनानिमित्त कॉमन योग प्रोटोकॉल अंतर्गत SKICC च्या मागील अंगणात दल सरोवराच्या काठावर योगासने करतील. या काळात सुमारे 7 हजार लोक त्यांच्यासोबत योगासने करतील. काही लोकांना विविध आसनांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून तो वेगवेगळ्या थीमवर साजरा केला जात आहे. 2024 च्या योग दिनाची थीम ‘योगा फॉर सेल्फ एंड सोसायटी’ आहे. (PM Modi)

2013 पासून जम्मू-काश्मीरचा 25 वा दौरा

2013 पासूनचा त्यांचा हा 25 वा जम्मू-काश्मीर दौरा आहे. 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर ही सातवी भेट आहे. निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदींची येथे भेट आणि योग दिनासारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणे, हा सकारात्मक संदेश मानला जात आहे. (PM Modi)

1500 कोटी रुपयांच्या 84 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान मोदी यांनी 20 जून रोजी जम्मू-काश्मीर दौऱ्यात रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन केले. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. ते JKCIP, चेनानी-पटनीटॉप-नाशरी विभाग, औद्योगिक वसाहत, 1800 कोटी रुपयांच्या 6 शासकीय पदवी महाविद्यालय प्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील 20 जिल्ह्यांतील 90 ब्लॉकमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यामुळे 15 लाख लोकांच्या माध्यमातून 3 लाख कुटुंबांपर्यंत प्रकल्पाचा लाभ पोहोचणार आहे. याशिवाय पंतप्रधान 2000 सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीचे पत्रही देणार आहेत. (PM Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.