काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राजकीय पक्षाकडून देण्यात येणाऱ्या आश्वासनाबद्दल एक ट्विट सोशल मीडिया वर केले होते. त्या विधानावर मोदींनी जोरदार टीका केली आहे. यामुळे एकूणच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपाच्या हाती आयते कोलीत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) लगेच प्रचारात हा विषय उचलत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेसच्या विविध आश्वासनांवरून पंतप्रधानांनी निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – Mumbai Police : मुंबईतील १५० पोलीस निरीक्षक निघाले जिल्ह्याबाहेर)
काँग्रेसची तथाकथित गॅरंटी अपूर्ण राहिली आहे. त्या राज्यांतील लोकांसोबत हा मोठा धोका आहे. असल्या राजकारणाचे गरीब, युवक, शेतकरी आणि महिला शिकार बनत आहेत. त्यांना योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. सध्याच्या योजनाही कमजोर केल्या जात आहेत, असा निशाणाही मोदींनी साधला आहे. आता लोकांसमोर काँग्रेसचा पर्दाफाश झाला आहे. आज काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यापैकी कोणत्याही राज्यावर नजर टाकली तरी लक्षात येईल की, विकासाची गती आणि राज्याची आर्थिक स्थिती वाईट बनली आहे, अशी टीका मोदींनी केली आहे.
हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असून काही योजनांमध्ये राज्यांवर आर्थिक भार पडला आहे. कर्नाटकातील महिलांना मोफत बसची योजनाही गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरून खर्गेनी सरकारचे कान उपटले आहेत. राज्य दिवाळखोरीत निघणार नाही, अशीच आश्वासने द्यायला हवीत, असा सल्लाच खर्गेनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community