PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्मान भारत योजनेला चालना

195
PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्मान भारत योजनेला चालना
PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्मान भारत योजनेला चालना

१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक शासकीय कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. (PM Modi Birthday) आयुष्मान भव योजनेद्वारे सर्वसामान्यांना आरोग्यविषयक समस्यांची माहिती मिळेल, तसेच शासकीय योजना काय आहेत. त्यांचा लाभ कशाप्रकारे घेता येईल, याविषयी संपूर्ण माहिती मिळेल. सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या या मोहिमेद्वारे ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ ३५ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या दिवशी 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी 60 कोटी देशवासियांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफतमध्ये उपचार देतील. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत त्यांनी महिला आणि शोषित समाजासाठी काम केले. त्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Marathwada Water Grid Project : उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली; देवेंद्र फडणवीस)

आरोग्यमंत्री मांडविया म्हणाले, ”पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून आम्ही आयुष्मान भव कार्यक्रम राबवणार आहोत. (PM Modi Birthday) 17 सप्टेंबरला ही मोहीम सुरू केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून त्याची अंमलबजावणी केली जाते. याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे. या मोहिमेअंतर्गत आम्हाला आरोग्य सेवांना अधिक प्रोत्साहन देता येईल. तसेच आरोग्याशी संबंधित योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचाही आम्ही प्रयत्न करू. जेणेकरून भारत सरकारच्या योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतील. या निमित्ताने देशभरातील लाखो आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर आयुष्मान मेळा आयोजित केला जाईल. या मेळ्यांमध्ये लोकांना आरोग्यविषयक माहिती आणि सेवा पुरविल्या जातील. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना आयुष्मान कार्ड दिले जातात. या योजनेतून आयुष्मान कार्ड वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार आहे. गावात आणि खेड्यापाड्यात आयुष्मान सभा आयोजित केली जाईल. तसेच यामध्ये आरोग्याविषयक जनजागृती ही केली जाईल.” (PM Modi Birthday)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.