PM Modi : भाजपाचे ‘मिशन दक्षिण भारत’; ५८ जागांवर लक्ष

202
Chandrapur: पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर सभेबाबत केले ट्विट, म्हणाले...
Chandrapur: पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर सभेबाबत केले ट्विट, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाने यावेळी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला आहे. मात्र, चारशेचा आकडा कसा गाठता येईल? याकडे भाजपाच्या (BJP) रणनितीकारांचे लक्ष लागून आहे. (PM Modi)

दक्षिणेतील ‘ती’ पाच राज्ये कोणती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी हा आकडा गाठण्यासाठी दक्षिण भारतावर फोकस केला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी आणि तामिळनाडू या पाचही राज्यांत योजनाबध्द पध्दतीने निवडणूक लढण्याची योजना भाजपाने आखली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या राज्यात यापूर्वी यश मिळाले नाही तेथे भाजपाकडून खास लक्ष दिले जात आहे. (PM Modi)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : एकूण सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूका; शनिवारी होणार तारखा जाहीर)

लोकसभेच्या १२९ जागा आहेत

भारतातील दक्षिणेकडील (south India) पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण १२९ जागा आहेत. यात तामिळनाडू (३९), कर्नाटक (२८), केरळ (२०), तेलंगना (१७) आणि पुडुचेरी (१) जागांचा समोवश आहे. (PM Modi)

फक्त २९ खासदार निवडून आले होते

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाला यातील केवळ २९ जागा मिळाल्या होत्या. यात कर्नाटकात २५ आणि तेलंगणातील चार जागांचा समावेश आहे. उर्वरित केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यांत भाजपाचे खाते सुध्दा उघडले नव्हते. (PM Modi)

(हेही वाचा- America On CAA : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीवर आमचे बारकाईने लक्ष)

२०२४ मध्ये दुप्पट जागा जिंकण्याचे लक्ष्य

आता भाजपाने (BJP) लोकसभेच्या या निवडणुकीत दक्षिणेच्या पाच राज्यांत दुप्पट जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अर्थात २०१९ मध्ये मिळालेल्या २९ जागांच्या दुप्पट जागा म्हणजे ५८ जागा. आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासात केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही. (PM Modi)

मोदींनी विडा उचलला  

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपाची शक्ती दुप्पट करण्याचा विडा उचलला आहे. अलीकडेच मोदींनी त्रिशूरमध्ये रोड शो आणि रॅली काढून आपले ध्येय व्यक्त केले. आता भाजपा नेते तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रचाराला सुरुवात करणार आहेत. कर्नाटकात भाजपाचे कॅडर आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना २५  जागा मिळाल्या होत्या. जेडीएससोबत झालेल्या करारानंतर यावेळीही पीएम मोदींना कर्नाटकमध्ये मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. (PM Modi)

(हेही वाचा- Bombay High Court : समृद्धी महामार्गावर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे वाढवा; उच्च न्यायालयाचा आदेश)

पंतप्रधान तीन राज्यांच्या मोहिमेवर

नरेंद्र मोदी (PM Modi) आजपासून दक्षिणेतील तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज केरळमध्ये पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एनडीएचे लोकसभा खासदार व्ही मुरलीधरन, अनिल के अँटनी, शोभा सुरेंद्रन आणि बैजू कलसाला हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (PM Modi)

लोकसभा निवडणुकीला (Loksabha election 2024) आता अवघे काही दिवस उरले असून भाजपाने दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की दक्षिणेत भाजपाला अद्याप मोठी आघाडी मिळालेली नाही. (PM Modi)

(हेही वाचा- Prakash Ambedkar : पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांबरोबर आम्ही नाही- प्रकाश आंबेडकर)

पंतप्रधान मोदी आज केरळला पोहोचणार आहेत

मोदी सकाळी १०.३० वाजता केरळमधील पथनामथिट्टा येथे पोहोचणार आहेत. येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन त्यांचे स्वागत करतील. याशिवाय पक्षाचे केरळ प्रभारी प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस जॉर्ज कुरियन आणि पठाणमथिट्टा जिल्हाध्यक्ष व्ही.ए. सूरज हे देखील या काळात उपस्थित राहणार आहेत. (PM Modi)

एनडीएचे लोकसभा खासदार व्ही मुरलीधरन, अनिल के अँटनी, शोभा सुरेंद्रन आणि बैजू कलसाला हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपालही या सभेला  उपस्थित राहणार आहेत. पद्मजा वेणुगोपाल अलीकडेच काँग्रेससोडून भाजपात सामील झाल्या तोडले आहेत. (PM Modi)

(हेही वाचा- Pan Masala : महाराष्ट्रात पान मसालाला नो एन्ट्री, बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार)

तामिळनाडूत पहिल्यांदाच युतीशिवाय भाजप

तमिळनाडूमध्ये भाजपा प्रथमच कोणत्याही पक्षाशी युती न करता निवडणूक लढणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाईच्या वादामुळे गेल्या वर्षी अन्नाद्रमुक या पक्षाशी असलेली युती युती तोडली. पंतप्रधान मोदी आज कन्याकुमारीमध्ये प्रचार करणार आहेत. भाजपाचे येथे मजबूत अस्तित्व आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच डीएमके आणि अभिनेता विजयकांत यांच्या पक्षाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. तामिळनाडूमध्ये घराणेशाहीचे राजकारण आणि भ्रष्टाचारावरून भाजपा सातत्याने द्रमुकवर निशाणा साधत आहे. (PM Modi)

(हेही वाचा- Vanchit Bahujan Alliance समोर ४ जागांचा प्रस्ताव…)

तेलंगणातही प्रसिद्धी होईल

पीएम मोदी (PM Modi) तेलंगणातही प्रचार करणार आहेत. आज संध्याकाळी ते मलकाजगिरी येथे रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत पक्षाचे लोकसभा उमेदवार एटाळा राजेंद्र आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हे देखील सामील होतील. रोड शोच्या निमित्ताने पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे. रोड शो संपेपर्यंत काही भाग जनतेसाठी मर्यादित राहतील. राजभवनात रात्र घालवल्यानंतर पंतप्रधान मोदी उद्या नागरकुर्नूल येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. रविवारी चिलाकलुरीपेटा येथे भाजपा-टीडीपी आणि जनसेना यांच्या संयुक्त बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. (PM Modi)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.