PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप

136
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे 51,000 तरुणांना नियुक्ती पत्राचे वाटप करणार आहेत. नियुक्ती यावेळी पंतप्रधान या तरुणांशी संवाद देखील साधणार आहेत. सोमवार 25 सप्टेंबर रोजी पंतप्रधान कार्यलाकडून ही माहिती देण्यात आली होती.

या विभागासाठी होणार नियुक्ती पात्रांचे वाटप

देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळावा (PM Narendra Modi) आयोजित करण्यात आला आहे. आज देशभरातील पोस्ट ऑफिस, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, संरक्षण मंत्रालयासह विविध मंत्रालये या विभागांमधील भरतीची नियुक्ती पत्रे पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखाना GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…)

पंतप्रधान कार्यालयाने दिली माहिती

पंतप्रधान (PM Narendra Modi) कार्यालयाने सांगितलं की, नवनियुक्त नियुक्त उमेदवारांसाठी iGOT कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी प्रारंभ याद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळत आहे. यामुळे ‘कुठेही कोणत्याही डिव्हाइस’ द्वारे शिक्षण घेण्यासाठी 680 हून अधिक ई-लर्निंग कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.