गुजरातच्या मोरबी या ठिकाणी नदीवरील झुलता पूल अचानक तुटल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत १४० हून अधिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर ते स्तब्ध झाल्याचेही पाहायला मिळाले.
केवडिया या ठिकाणी होणाऱ्या एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, मी सध्या एकता नगरमध्ये आहे. पण माझं मन मोरबीतील झालेल्या घटनेतील पीडितांकडे आहे. माझ्या आयुष्यात मी अशा प्रकारचे दुःख खूप कमी वेळा अनुभवले आहे. या घटनेमुळे हृदयात दुःख तर दुसरीकडे आपले कर्तव्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यी दुर्घटनेत मी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो.
बघा व्हिडिओ
#WATCH | PM Modi gets emotional as he talks about #MorbiBridgeCollapse tragedy, in Gujarat's Banaskantha pic.twitter.com/0pmVmGmC0f
— ANI (@ANI) October 31, 2022
दरम्यान, मोरबी नगरपालिकेने सुमारे 6 महिन्यांच्या नूतनीकरणानंतर 26 ऑक्टोबर रोजी गुजराथी नववर्षानिमित्त हँगिंग ब्रिज (झुला पुल) सर्वसामान्यांसाठी खुला केला होता. त्याच्या देखभालीची जबाबदारी ओरेवा कंपनीकडे देण्यात आली होती. कंपनीचे एमडी जयसुख पटेल यांच्या उपस्थितीत ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. त्यांनी मजबूत केबल्स आणि स्टीलचा वापर करून त्याचे नूतनीकरण केल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. परंतु, मोरबी नगरपालिकेने ओरेवा कंपनीला या अपघातासाठी जबाबदारी ठरवले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंग झाला यांनी सांगितले की, नगरपालिकेने या पूलाला फिटनेस सर्टिफिकेट दिले नव्हते. त्यांची मंजूरी न घेताच हा पूल जनतेसाठी खुला करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community