राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल…; PM Modi यांचे शरद पवारांना आव्हान

152
Narendra Modi : मोदी विकसित भारत देऊन जाईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिला विश्वास

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राहुल गांधींकडून वदवून घ्यावे की, ते आयुष्यात कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाहीत. आता त्यांनी त्यांना निवडणुका आहेत, म्हणून गप्प केले आहे. टाळे ठोकले आहे त्यांना. पण एकदा तरी त्यांच्याकडून असे वदवून घ्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शरद पवारांना दिले.

ते ( शरद पवार ) आपले हे आव्हान स्वीकारू शकत नाही. कारण त्यांना माहीत आहे, निवडणूक संपल्यानंतर ते पुन्हा सावरकरांना शिव्या द्यायला सुरुवात करणार आहेत, असेही मोदी (PM Modi) म्हणाले. ते शिवतीर्थावर आयोजित महायुतीच्या प्रचारसभेला संबोधित करत होते.

मुंबई चैत्यभूमीपासून प्रेरणा घेते, हे देखील आमचेच सरकार आहे, ज्याने देश व जगभरात डॉ. बाबासाहेबांचे पंचतिर्थ विकसित केले आहेत. बंधूंनो, शिवतिर्थच्या या भूमीत कधीकाळी बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावकरांचा आवाज घुमला होता. मात्र, आज विश्वासघाती आघाडीला पाहून, त्यांच्या आत्म्याला किती दु:ख होत असेल. या नकली शिवसेनावाल्यांनी बाळासाहेबांना धोका दिला. यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला, सत्तेसाठी हे राम मंदिराला शिव्या देण्याऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी हे मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले. जी काँग्रेस दिवस-रात्र वीर सावरकरांना शिव्या देते आज त्यांच्या कुशीत बसले आहेत, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी (PM Modi) नाव न घेता, उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.

“बंधूंनो तोही एक काळ होता, कधी शिवसेनेची ओळख येथे घुसखोरांविरोधात उभे राहणारी म्हणून होती. आज तीच नकली शिवसेना, सीएएला विरोध करत आहे. आता यांचा हिंदू, बौध्द, जैन, शिख शरणार्थिंना नागरिकत्व देण्यासही आक्षेप आहे. हिंदुस्तानात असे हृदयपरिवर्तन कुठल्याही पक्षाचे झालेले नाही. जसे आताच्या नकली शिवसेनेचे झाले आहे, इशी बोचरी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.