PM Modi in Mumbai: लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर; २९ हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन करणार

131
PM Modi in Mumbai: लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर; २९ हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन करणार
PM Modi in Mumbai: लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर; २९ हजार कोटींच्या कामाचे भूमिपूजन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Mumbai) आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election Result) निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत (PM Modi In Mumbai) येत आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. त्यात मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजनही मोदी करणार आहेत.

(हेही वाचा –सन २०२७ मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल; Amitabh Kant यांचा विश्वास)

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच, मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवले जाते. या केंद्राचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने ते नव्याने बांधण्यात येणार आहे. याचेही भूमिपूजन होणार आहे. (PM Modi in Mumbai)

(हेही वाचा –Brian Lara on Record : ब्रायन लाराच्या मते ‘हे’ दोन भारतीय फलंदाज मोडू शकतील त्याचा विक्रम)

नवी मुंबईत कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत. पंतप्रधान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही ते सुरू करतील. हा एक इंटर्नशिप कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश युवकांना कौशल्य विकास आणि उद्योगात संधी उपलब्ध करून देऊन बेरोजगारीचे निराकरण करणे आहे. (PM Modi in Mumbai)

(हेही वाचा –Vidhan Parishd Election Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनितीवर शिक्कामोर्तब !)

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. (PM Modi in Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.