आझाद हिंद फौजेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचे आनावरण करण्यात आले. नेताजींच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. याच ठीकाणी सुभाष बाबूंचा ग्रेनाईडचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याप्रसंगी 2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठी सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्वांतत्र्याच्या नायकाला आदरांजली
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, या ठिकाणाहून आपली संसद जवळ आहे. क्रियाशीलता आणि लोकनिष्ठेचं प्रतिक असणारे अनेक भवन जवळ आहेत. वीर शहिदांचं नॅशनल मेमोरियलदेखील जवळ आहे. त्यामुळेच हे ठिकाण सर्वांना प्रेरणा देईल. आज आपण इंडिया गेटवर अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि नेताजींना आदरांजी देत आहोत. नेतांजींनी स्वाधीन आणि स्वतंत्र भारताचा विश्वास दिला. ज्यांनी मोठ्या गर्वाने, मोठ्या आत्मविश्वासाने साहसाने, इंग्रजी सत्तेसमोर सांगितलं की मी स्वातंत्र्याची भीक घेणार नाही तर मी ती हिसकावून घेईन. ज्यांनी भारताच्या जमिनीवर पहिलं स्वतंत्र सरकार स्थापन केलं. त्यांना आदरांजली म्हणून रविवारी नेताजींची प्रतिमा डिजीटल पद्धतीने इंडिया गेटवर स्थापन झालीये. लवकरच या ठिकाणी ग्रेनाईटची प्रतिमा लावण्यात येईल. ही स्वांतत्र्याच्या नायकाला आदरांजली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
(हेही वाचा – अरे बापरे! जगातील प्रत्येकाला होणार ओमायक्रॉन, काय म्हणालं WHO)
नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा
नेताजींचा हा पुतळा आपल्याला राष्ट्रीय कर्तव्याची आठवण करुन देईल. येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल. गेल्या वर्षीपासून नेताजींची जयंतीला पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपदा प्रबंधन पुरस्कार दिले गेले आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच हे दिले गेले आहेत सर्व व्यक्ती सर्व संस्थांचा सत्कार झाला त्यांचे अभिनंदन पंतप्रधानांनी केले. अद्वैत गडानायक हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रस्तावित पुतळ्याचे शिल्पकार असणार आहेत.
Join Our WhatsApp Community