नरेंद्र मोदी (PM Modi Kolhapur Sabha) यांची आज (२७ एप्रिल) कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवारी धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सभेआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. छत्रपती शाहू महाराजांचा (Chhatrapati Shahu Maharaj) पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला आता भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (PM Modi Kolhapur Sabha)
(हेही वाचा- Mumbai Water Supply : मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतकेच पाणी)
काँग्रेसने जे पॅम्प्लेट छापले, त्यावर राहुल गांधी, सोनिया गांधींचे फोटो सुद्धा नाही
“शाहू महाराज छत्रपतींचा सन्मान महायुतीने केला आहे. महाविकास आघाडीने त्यांचा अपमानच केलाय. काँग्रेसने जे पॅम्प्लेट छापले आहेत. त्यावर राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे (Sonia Gandhi) फोटो सुद्धा नाहीत. राहुल गांधीचा फोटो छापला तर मत सुद्धा मिळणार नाहीत, असा विश्वास त्यांना आहे. त्यांचा सन्मान करायचा होता तर राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) महाराजांचा अर्ज भरायला का आले नाहीत?” असं म्हणत भाजपाचे (BJP) नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. (PM Modi Kolhapur Sabha)
या सभेनंतर दोन्ही उमेदवारांचा गुलाल निश्चित
कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदींची (PM Modi Kolhapur Sabha) सभा व्हावी असा सर्वांचा आग्रह होता. आजची कोल्हापुरातील नरेंद्र मोदी यांची सभा न भूतो न भविष्यती अशी होईल. या सभेनंतर दोन्ही उमेदवारांचा गुलाल निश्चित होईल. निवडणुका या विकासात्मक मुद्द्यावर व्हायला हव्यात. पण विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. संविधान खतरे में हैं, देश खतरे में हैं असा प्रचार ते करत आहेत. अशा प्रचारावर लोक विश्वास ठेवत नाही. असंही धनंजय महाडिक म्हणालेत. (PM Modi Kolhapur Sabha)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community